दहा वाहनचालकांना दंड

By admin | Published: January 7, 2015 12:19 AM2015-01-07T00:19:21+5:302015-01-07T00:26:25+5:30

अवैध गौणखनिज उत्खनन : भुदरगड तहसील भरारी पथकाचे छापे

Penalties for ten drivers | दहा वाहनचालकांना दंड

दहा वाहनचालकांना दंड

Next

गारगोटी : भुदरगड तालुक्यात अवैधरीत्या गौणखनिज वाहतूक करणाऱ्या दहा वाहनांसह चालकांवर तहसील विभागाच्या भरारी पथकाने आज, मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे ही कारवाई करण्यात आली.
भुदरगड तालुक्यात वाळू, माती, दगड यांची मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाहतूक सुरू असते. या विरोधात नदीकाठालगतच्या लोकांच्या सतत तक्रारी असतात पण, हे वाहतूक करणारे गावातीलच वाहनधारक असल्याने उघड-उघड विरोध होत नव्हता. शिवाय गारगोटी-कोल्हापूर महामार्गावरील कूर नदीवरील पुलाशेजारी बिनदिक्कतपणे वाळू उपसा भरदिवसा पहाटे सुरू असतो. गत महिन्यात याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन कारवाईचे आदेश दिले.
आज सकाळी निवासी नायब तहसीलदार सदानंद महाडिक, नायब तहसीलदार व्ही. एन. बुट्टे, एच. आर म्हेत्रे यांच्या देखरेखीखाली पाच मंडल अधिकारी व वीस तलाठ्यांची पथके करण्यात आली. सकाळी सहा वाजता गोपनीयता राखत वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून आठ ट्रॅक्टर व दोन डंपर पकडण्यात आले. ही सर्व वाहने विनापरवाना गौण खनिज उत्खनन करीत होती. तहसीलदार शिल्पा ओसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार व मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलिसपाटील काम करीत आहेत.

७८ हजाराचा दंड वसूल
कारवाईमध्ये जगन्नाथ एकशिंगे(माजगाव), रवींद्र कांबळे (कणसवाडी), सुभाष सूर्यवंशी (पाथर्डे), संतोष हळदकर, सुशांत हळदकर (कूर), देसाई (मडलगे), नामदेव कोळी, गणपतराव जाधव (शेणगाव), सीताराम वर्पे (वर्पेवाडी) उत्तम मेंगाणे (मडिलगे खुर्द) या दहा वाहनचालकांसह दोन वाहनांना ७८ हजार ४०० रुपये दंड करण्यात आला.

Web Title: Penalties for ten drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.