कळे बाजारपेठेमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:33+5:302021-06-06T04:18:33+5:30

कळे परिसरामध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असून नागरिकांकडून लॉकडाऊन नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी ...

Penalties for wandering in the keys market for no reason | कळे बाजारपेठेमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना दंड

कळे बाजारपेठेमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना दंड

Next

कळे परिसरामध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असून नागरिकांकडून लॉकडाऊन नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी प्रियदर्शनी मोरे यांनी कळे येथे भेट देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी करून प्रशासनास सूचना केल्या. कुंभारवाडा चौकांमध्ये अनावश्यक वर्दळ दिसून आल्याने येथे थांबून पथकाने रस्त्यावर विनाकारण फिरणारे नागरिक व वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करत १७ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.

यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कवठेकर , विस्तारअधिकारी पी. डी. भोसले, आर. एम. तळपे, मंडलधिकारी सुरेश ठाकरे, ग्रामविकास अधिकारी आर. आर. पाटील, तलाठी संदीप कांबळे, भिकाजी काळे यांच्यासह ग्रामपंचायत व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ०५ कळे कारवाई

ओळ कळे : कुंभारवाडा चौकामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करताना जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी मोरे, सुभाष सावंत व इतर.

Web Title: Penalties for wandering in the keys market for no reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.