ट्रॅव्हल्स कंपनीकडून ‘ई’ चलनद्वारे दंडाची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:18 AM2019-08-03T01:18:54+5:302019-08-03T01:19:28+5:30
यापूर्वी शहाजी ट्रॅव्हल्स आरामबसचे चालक नासीर नायकवडी (रा. कºहाड, जि. सातारा) यांच्याकडून २४ गुन्ह्णांचा चार हजार ८०० रुपये दंड घेतला होता.
कोल्हापूर : शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ‘निता टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ या कंपनीच्या आराम बसचा नंबर आॅनलाईन ‘ई’ चलन मशीनद्वारे सर्च केला असता, यापूर्वी २१ गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी या कंपनीकडून २२ गुन्ह्णांचा पाच हजार ८०० रुपये दंड भरून घेतला. गुरुवारी (दि. १) दुपारी ताराराणी सिग्नल चौकात ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी शहाजी ट्रॅव्हल्स आरामबसचे चालक नासीर नायकवडी (रा. कºहाड, जि. सातारा) यांच्याकडून २४ गुन्ह्णांचा चार हजार ८०० रुपये दंड घेतला होता.
कोल्हापूर, इचलकरंजी शहरात वाहतूक दंड भरून घेण्यासाठी ‘ई’ चलन मशीनचा वापर पोलिसांकडून केला जात आहे. मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, एकेरी मार्ग असतानाही विरोधी दिशेने वाहन चालविणे, फॅन्सी नंबरप्लेट अशा नियमबाह्य वाहनधारकांच्या संबंधित दुचाकी, कारचा फोटो वाहतूक पोलीस मशीनद्वारे काढत आहेत. वाहनचालकाने केलेल्या गुन्ह्याचे कलम टाकताच दंडाची रक्कम स्क्रीनवर दिसते. ही रक्कम वाहनधारकाकडून एटीएम, डेबिट कार्ड वापरून आॅनलाईनद्वारे भरून घेतली जात आहे. एखाद्या व्यक्तीने देशभरात कितीवेळा वाहतुकीच्या नियमांचा भंग केला, याची कुंडली या मशीनमध्ये पाहायला मिळते. अशा प्रकारे १ आॅगस्टला दुपारी ताराराणी सिग्नल चौकात ‘निता टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ची खासगी आराम बस वळसा घेऊन सुसाट सिग्नल तोडून निघाली होती. यावेळी ड्युटीवर असलेल्या हवालदार राजेंद्र कलगुटकर यांनी बस थांबविली. आराम बसचा नंबर (एम. एच. ४७ वाय ६३२३) मशीनवर सर्च केला असता, आतापर्यंत २१ वेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शामराव देवणे यांच्यासमोर एकूण २२ गुन्ह्णांचा कंपनीच्या नावे चालकाकडून दंड वसूल करून घेतला.