‘ई-केवायसी’ न केल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ४४ हजार शेतकऱ्यांची पेन्शन धोक्यात

By राजाराम लोंढे | Published: September 12, 2023 05:24 PM2023-09-12T17:24:50+5:302023-09-12T17:25:17+5:30

राजाराम लोंढे कोल्हापूर : जिल्ह्यातील ४४ हजार ५७८ शेतकऱ्यांनी अद्याप ‘ई-केवायसी’ न केल्याने त्यांची पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ...

Pension of 44 thousand farmers in Kolhapur district is at risk due to non-e-KYC | ‘ई-केवायसी’ न केल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ४४ हजार शेतकऱ्यांची पेन्शन धोक्यात

‘ई-केवायसी’ न केल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ४४ हजार शेतकऱ्यांची पेन्शन धोक्यात

googlenewsNext

राजाराम लोंढे

कोल्हापूर : जिल्ह्यातील ४४ हजार ५७८ शेतकऱ्यांनी अद्याप ‘ई-केवायसी’ न केल्याने त्यांची पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळणारी पेन्शन धोक्यात आली आहे. सप्टेंबर अखेर मुदत असून, या कालावधीत ‘ई-केवायसी’ व आधार लिंक केले नाही, तर पेन्शन कायमची बंद करण्याचा इशारा सरकारने दिल्याने कृषी विभागाची यंत्रणा सक्रिय झाली आहे.

केंद्र सरकारकडून ज्याच्या नावावर सात/बारा आहे, त्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन टप्प्यांत मिळतात. यामधून आयकर भरणारे, सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. लाभार्थी हयात आहे की नाही, यासह त्याची इतर माहिती व्हावी, यासाठी केंद्र सरकारने मार्च २०२३ मध्ये ‘ई-केवायसी’ व ‘आधार लिंक’ करण्याचे आदेश दिले होते. गेले सहा महिने सरकारने सातत्याने मुदतवाढ दिली आहे; पण, आता ३० सप्टेंबर २०२३ ही शेवटची मुदत असल्याने या कालावधीत पूर्तता न करणाऱ्या शेतकऱ्यांची पेन्शन कायमची बंद होणार आहे.

अखेर तालुका कृषी अधिकाऱ्यांना लॉगिंग मिळाले

पीएम किसान योजनेचे काम नेमके कोणी करायचे? याबाबत कृषी व महसूल विभागात वाद सुरू होता. कृषी विभागाने काम करण्याचा निर्णय झाला; पण, त्यांना लॉगिंगच दिले नव्हते. अखेर तालुका कृषी अधिकाऱ्यांना लॉगिंग मिळाल्याने आता या कामाला गती येणार आहे.

‘हातकणंगले’, ‘पन्हाळा’ मागे

ई-केवायसी करण्यात हातकणंगले, पन्हाळा, शिरोळ व गडहिंग्लज हे तालुके मागे आहेत. ४४ हजारपैकी २२ हजार ७७६ शेतकरी हे या चार तालुक्यांतील आहेत.

जिल्ह्यात ४.७१ लाख पात्र शेतकरी

जिल्ह्यात ‘पीएम किसान’चे ४ लाख ७१ हजार ३६७ शेतकरी पात्र आहेत. त्यातील ४ लाख २६ हजार ७८९ शेतकऱ्यांना तेरावा हप्ता आला आहे.


पीएम किसान योजनेचे लॉगिंग कृषी विभागाला मिळाले असून, स्थानिक अधिकाऱ्यांना तातडीने ई-केवायसीची पूर्तता करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी कृषी सहायकांना सहकार्य करून आपली केवायसी पूर्तता करून घ्यावी. - दत्तात्रय दिवेकर (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, काेल्हापूर)

 

ई-केवायसी व आधार लिंक अपूर्ण असलेले तालुकानिहाय शेतकरी :

तालुका       ई-केवायसी    आधार लिंक
आजरा            ३,१६१             २,३३७
भुदरगड          २,८९८            २,२९२
चंदगड            ३,३४२             २,९४४
गडहिंग्लज      ५,०३१             ३,३५२
गगनबावडा     ३४९               ३६४
हातकणंगले     ६,५६८           ३,८७३
कागल             १,०५६            १,५९३
करवीर            ४,६१८            ४,५४३
पन्हाळा           ५,७६८            ४,०४९
राधानगरी        २,५२९             २,२११
शाहूवाडी         ३,८४९             ३,७०७
शिरोळ            ५,४०९             २,५१९

Web Title: Pension of 44 thousand farmers in Kolhapur district is at risk due to non-e-KYC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.