पेन्शनरांचे आज भाजप कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:31+5:302021-07-15T04:18:31+5:30
कोल्हापूर : ई.पी.एस.९५ निवृत्तीवेतनधारक वाढीव पगाराबरोबर वाढीव निवृत्तीवेतन मिळावे. यासाठी गुरुवारी देशभरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयांवर हल्लाबोल आंदोलन ...
कोल्हापूर : ई.पी.एस.९५ निवृत्तीवेतनधारक वाढीव पगाराबरोबर वाढीव निवृत्तीवेतन मिळावे. यासाठी गुरुवारी देशभरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयांवर हल्लाबोल आंदोलन करणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील भाजपच्या कार्यालयावरही
गुरुवारी सकाळी अकरा वाजता हल्लाबोल आंदोलन केले जाणार आहे.
गेले १२ वर्षे ई.पी.एस. पेन्शनर्स असोसिएशन सर्व श्रमिक संघाच्या माध्यमातून ९ हजार पेन्शन अधिक महागाई भत्ता, वैद्यकीय मदत, प्रवासात सवलत, रेशन सुविधा द्यावी. सध्या तरी कोशियारी समितीने केलेल्या शिफारशीनुसार तीन हजार रुपयांची पेन्शन द्यावी. वाढीव पेन्शनबाबत न्यायालयानेही पेन्शनरांच्या बाजूने निर्णय दिला आहे. तरीसुद्धा सरकार निर्णय घेत नाही. त्यामुळे ऑल इंडिया को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ ईपीएस पेन्शनर्स असोसिएशनने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व भाजप कार्यालयांवर हल्लाबोल आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार गुरुवारी आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती अप्पा कुलकर्णी, प्रकाश जाधव यांनी दिली.