किमान नऊ हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे, पेन्शनरांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 06:48 PM2020-09-23T18:48:19+5:302020-09-23T18:50:17+5:30
किमान नऊ हजार रुपये पेन्शन (निवृत्तिवेतन) मिळाली पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी ईपीएस ९५ पेन्शनरांनी बुधवारी कोल्हापुरातील भविष्य निर्वाह निधीच्या (प्रॉव्हिडंट फंड) कार्यालयासमोर निदर्शने केली.
कोल्हापूर : किमान नऊ हजार रुपये पेन्शन (निवृत्तिवेतन) मिळाली पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी ईपीएस ९५ पेन्शनरांनी बुधवारी कोल्हापुरातील भविष्य निर्वाह निधीच्या (प्रॉव्हिडंट फंड) कार्यालयासमोर निदर्शने केली.
मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अन्यथा कोरोना कमी झाल्यानंतर प्रॉव्हिडंट फंडाची देशभरातील कार्यालय बंद पाडण्यात येतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. ऑल इंडिया को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ ईपीएस पेन्शनर्स असोसिएशन आणि सर्व श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली पेन्शनरांनी ही निर्दशने केली.
दुपारी बाराच्या सुमारास हे आंदोलनकर्ते भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयासमोर जमले. त्यांनी ह्यपेन्शन आमच्या हक्काचीह्ण, ह्यकिमान नऊ हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजेह्ण, अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. त्यानंतर सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष अतुल दिघे, सचिव अनंत कुलकर्णी, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष गोपाळ पाटील, प्रकाश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त एम. डी. पाटगावकर यांना निवेदन दिले. यावेळी सुनील पाटील, पी. आर. पाटील, आदी उपस्थित होते.