लॉकडाऊन शिथिलपूर्वीच लोक रस्त्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 05:15 PM2020-05-02T17:15:56+5:302020-05-02T21:04:25+5:30
कोल्हापूर : लॉकडाऊन शिथिल होण्यापूर्वीच लोकांची रस्त्यांवर वर्दळ वाढली आहे. बहुतांश परिसरांतील बॅरिकेड हटविल्याने नागरिक दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन ...
कोल्हापूर : लॉकडाऊन शिथिल होण्यापूर्वीच लोकांची रस्त्यांवर वर्दळ वाढली आहे. बहुतांश परिसरांतील बॅरिकेड हटविल्याने नागरिक दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन बाहेर पडले आहेत. काही ठिकाणची कोल्ड्रिंक्सची दुकाने, दुचाकी दुरुस्ती करणारी गॅरेज, इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्तीची दुकाने उघडली आहेत. सोशल डिस्टन्सिंग, शासनाच्या नियमांनुसार त्यांच्याकडून व्यवसाय सुरू आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र शासनाकडून १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. तसेच ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी अथवा रुग्णच आढळून आलेले नाहीत, अशा परिसरात ३ मेनंतर काही अटींवर लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेतला. यामुळे कोल्हापुरातील कोल्ड्रिंक्स हाऊस, होलसेल दुकाने, कुलूप विके्रते, आॅप्टिशियन, चहाच्या टपºया, बांगड्या विक्री करणारे (कासार), इलेक्ट्रिक वस्तूंची दुरुस्ती, पंक्चर काढणारे मिस्त्रींनी महिन्यानंतर दुकाने सुरू केली आहेत. शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये रस्त्यांवर विक्रीसाठी माठ ठेवण्यात आले आहेत.
दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ वाढली
औद्योगिक वसाहतीमध्ये काही उद्योजकांनी व्यवसाय सुरू केले आहेत. कामगार कामावर येत असल्यामुळे शहरातील मुख्य मार्गांवरील बॅरिकेड्स काढण्यात आली आहेत. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ वाढली आहे.
---------------------------------------
गेल्या सव्वा महिन्यापासून कोल्हापुरातील बहुतांश नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोर पालन केले आहे. मात्र, घरातून बाहेर पडले नसल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे उत्पन्न थांबले आहे, अशा नागरिकांचा आता संयम सुटत आहे. त्यांच्याकडून किरकोळ स्वरूपात व्यवसायांना सुरुवातही केली जात आहे. या सर्व परिस्थितीमुळे पोलीस प्रशासनानेही कडक भूमिका घेणे कमी केले आहे.
----------------------------------------
लॉकडाऊन शिथिलबाबत अस्पष्टता
लॉकडाऊन शिथिलबाबत शनिवारी सायंकाळपर्यंत राज्य शासनाकडून कोणतेही स्पष्ट आदेश आले नाहीत. याचवेळी सोशल मीडियावर काही व्यवसायांना सवलत दिली असल्याचा संदेश पसरला. त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.