Maharashtra Assembly Election 2019 (18062) जिल्ह्याबाहेरील तीन निकालांकडे लोकांचे लक्ष -कोथरूडबद्दल उत्सुकता : मुंबईतही दोन उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:47 PM2019-10-23T12:47:20+5:302019-10-23T12:49:37+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहेच; परंतु त्याशिवाय कोथरूड (पुणे)मध्ये पालकमंत्री चंद्रकांत ...

People's attention to three bodies outside the district | Maharashtra Assembly Election 2019 (18062) जिल्ह्याबाहेरील तीन निकालांकडे लोकांचे लक्ष -कोथरूडबद्दल उत्सुकता : मुंबईतही दोन उमेदवार

Maharashtra Assembly Election 2019 (18062) जिल्ह्याबाहेरील तीन निकालांकडे लोकांचे लक्ष -कोथरूडबद्दल उत्सुकता : मुंबईतही दोन उमेदवार

Next
ठळक मुद्देप्रमुख पक्षांनी ‘मनसे’च्या किशोर शिंदे या एकच उमेदवारास ताकद दिली आहे; परंतु

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहेच; परंतु त्याशिवाय कोथरूड (पुणे)मध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अंधेरी (पूर्व)मधून शिवसेनेकडून रमेश लटके व विलेपार्लेमधून काँग्रेसकडून अशोक जाधव हे रिंगणात आहेत. त्यामुळे या तिघांच्या निकालाकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पालकमंत्री पाटील हे पुणे पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत ते कधीच लढलेले नाहीत; परंतु राज्याचे राजकारण करणाऱ्या नेतृत्वाने जनतेतून निवडून आले पाहिजे, असा आग्रह पक्षाने धरल्याने त्यांना विधानसभेच्या थेट मैदानात उतरावे लागले. सुरुवातीला ते कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर, चंदगड किंवा राधानगरी मतदारसंघातून लढतील असे चित्र होते; परंतु निवडणूक लागल्यावर अचानक त्यांच्या नावांची भाजपने कोथरूडमधून घोषणा केली. सुरुवातीला तिथेही बरेच नाराजीनाट्य घडले. त्यांच्याविरोधात प्रमुख पक्षांनी ‘मनसे’च्या किशोर शिंदे या एकच उमेदवारास ताकद दिली आहे; परंतु तरीही हा भाजपचा गड असल्याने तेथून पालकमंत्री पाटील निवडून येण्यात अडचण दिसत नाही.

रमेश कोंडीराम लटके हे मूळचे शाहूवाडी तालुक्यातील शेंबवणेपैकी धुमकवाडीचे आहेत. ते तीन वेळा नगरसेवक होते. रोजगाराच्या शोधात त्यांचे वडील मुंबईला गेले व तिथे गिरणी कामगार झाले. त्यांची आई आजही अंधेरी मार्केटमध्ये भाजीविक्रीचे काम करतात. शिवाय त्यांचा फुलांचा व्यापार आहे. यावेळेलाही त्यांचा विजय होईल, असे चित्र आहे.
मूळचे कोलोली (ता. पन्हाळा) येथील माजी आमदार अशोक भाऊसाहेब जाधव हे विलेपार्ले मतदारसंघांतून तिसऱ्यांदा नशीब अजमावत आहेत. त्यांचे वडीलही नोकरीच्या शोधात मुंबईला गेले व त्यांनी तिथेच चांगले बस्तान बसविले. त्यामुळे पन्हाळा तालुक्यातील लोकांचे या निकालाकडे लक्ष आहे.
 

Web Title: People's attention to three bodies outside the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.