लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांमुळे गावाला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:05 AM2021-02-20T05:05:17+5:302021-02-20T05:05:17+5:30
अब्दुललाट : स्वच्छ व सुंदर गाव काय असते हे शिवनाकवाडी गावाने दाखवून दिले आहे. गावच्या लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांचा यामध्ये सिंहाचा ...
अब्दुललाट : स्वच्छ व सुंदर गाव काय असते हे शिवनाकवाडी गावाने दाखवून दिले आहे. गावच्या लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे. इतर गावांनीही या गावाचा आदर्श घेण्यासारखा आहे, असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवनाकवाडी (ता. शिरोळ) या गावास स्व. आर. आर. पाटील सुंदरगाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मंत्री डॉ. यड्रावकर, जि. प.चे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. मंत्री यड्रावकर म्हणाले, सन २०१९-२० मध्ये केलेल्या कामाचा आढावा घेऊन शासनाने या गावाची पुरस्कारासाठी निवड केली. एकीच्या बळावर या गावाने संवर्धन स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण आणि सामाजिक भान ठेवून गावाचा विकास केला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सरपंच श्रीकांत खोत, उपसरपंच सुरेखा खोत, सदस्य वर्षा खोत, सचिन पुजारी, विजय खोत, नानासाहेब पुजारी, अश्विनी खोत, आशा खोत, भारती आरगे, राहुल कुरुंदवाडे, शानाबाई कटियावर उपस्थित होते.
फोटो - १८०२२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - कोल्हापूर जिल्हा परिषद येथे शिवनाकवाडी गावास स्व. आर. आर.पाटील सुंदरगाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावर, बजरंग पाटील, सतीश पाटील उपस्थित होते.