रमजान ईदची नमाज कुटुंबासह घरातच अदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:24 AM2021-05-14T04:24:38+5:302021-05-14T04:24:38+5:30
कोल्हापूर : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) होणारी रमजान ईदची नमाज आपल्या कुटुंबासह घरातच अदा करावी. मौलाना मोबीन ...
कोल्हापूर : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) होणारी रमजान ईदची नमाज आपल्या कुटुंबासह घरातच अदा करावी. मौलाना मोबीन बागवान हे सकाळी ९.३० वाजता मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर नमाज पठण करणार आहेत.
दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या पटागणांवर केवळ पाचजणांच्या उपस्थितीत मौलाना मुबीन बागवान हे नमाज पठण करणार आहेत. सद्यपरिस्थितीत कोरोनाचे रुग्ण शहरात झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी अत्यंत साधेपणाने आपल्या कुटुंबासमावेत नमाज अदा करून घरीच ईद साजरी करावी. यावेळी जगातील मानवजातीची कोरोनापासून सुटका व्हावी, याकरिता सर्व बांधवांनी दुआ करावी. रमजान नियमानुसार लोकांनी जकात व चंदा कोराेनामधील गरीब लोकांना दान करावा, असे आवाहन मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, उपाध्यक्ष आदिल फरास यांनी केले आहे.