‘आजरा’तील सत्ता संघर्षास पूर्णविराम
By Admin | Published: March 11, 2017 11:40 PM2017-03-11T23:40:38+5:302017-03-11T23:40:38+5:30
सत्ताधाऱ्यांकडे अकरा : विरोधी गटांकडे दहा संचालक
आजरा : स्वीकृत संचालक प्रश्नावरून आजरा साखर कारखान्यात उफाळून आलेला सत्तासंघर्ष नाट्यमय घडामोडीनंतर संपुष्टात आला असून, सत्ताधाऱ्यांकडे अकरा, तर विरोधकांकडे दहा संचालक असे बलाबल झाले आहे.आजरा साखर कारखान्यात विश्वनाथ करंबळी यांना स्वीकृत संचालक म्हणून घेतल्यानंतर एक जागा रिक्त आहे. या संचालक नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुका झाल्याबरोबर सत्तारूढ आघाडीतील कुरबुरी विचारात घेऊन तातडीने शनिवारी बैठक बोलविली होती. याच दरम्यान विरोधी आघाडीने उमेश आपटे यांच्या अपात्रतेस स्थगिती आणण्याबरोबरच सत्तारूढ सोबत (स्वगृही) परतले.जिल्हा परिषद निवडणुकांच्या रुसण्या फुगण्यातून स्वीकृत संचालक निवळ बैठकीत एखाद्या संचालक विरोधात जाण्याची शक्यता गृहीत धरून ही बैठकच तहकूब करण्यात आली. शनिवारी गोकुळ येथे संचालक रवींद्र आपटे व आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत सत्ताधारी अकरा संचालकांची बैठक पार पडली. यावेळी सर्वांनी एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला. न्यायालयीन प्रक्रियेत उमेश आपटे यांचे संचालकपद कितपत टिकून राहणार? यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
तूर्तास या सत्तासंघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. पुन्हा एकवेळ बलाबल मात्र अकरा विरुद्ध दहा असे झाले आहे.