पंचगंगा प्रदूषणमुक्तीचे कालबद्ध नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:26 AM2021-01-16T04:26:40+5:302021-01-16T04:26:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या आराखड्याचे सूक्ष्म नियोजन करा, आराखडा पूर्णत्वास आणण्याचा कालावधी ठरवून तो वेळेत पूर्णत्वास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या आराखड्याचे सूक्ष्म नियोजन करा, आराखडा पूर्णत्वास आणण्याचा कालावधी ठरवून तो वेळेत पूर्णत्वास आणा व सुरू असलेल्या प्रकल्पांना गती द्या, अशी सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी केली.
विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंचगंगा प्रदूषणाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या २२० कोटींच्या आराखड्याची सविस्तर माहिती दिली. बैठकीला आयुक्त कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी रवींद्र आंधळे, क्षेत्र अधिकारी संजय मोरे, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड उपस्थित होते.
यावेळी राव म्हणाले, इचलकरंजी येथील १९९८ चा एसटीपी प्लॅन्ट अद्ययावत करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवा. येथील एसटीपी प्लॅन्टच्या बंद पडलेल्या कामाचे तातडीने फेरनिविदा काढून हे काम सुरू करा, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदमधील ज्या गावांचे पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते अशा कुरुंदवाड, हुपरी, हातकणंगले, शिरोळ या शहरांनाही पुढील टप्प्यात सामावून घ्या. नागरी भागातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करा. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून पंचचंगा प्रदूषणमुक्तीसाठीची कालबद्ध कार्यवाही करा. शासन स्तरावरील अपेक्षित मंजुरीसाठीचे प्रस्ताव तयार करून ते पाठवा. स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान, घनकचऱ्याचे व्यवस्थापन करा.
--