...तर कायमची बंदी-: दुसऱ्यांदा सापडल्यास थेट व्यवसाय बंदी - कोल्हापूर  महापालिकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 12:47 PM2020-04-15T12:47:38+5:302020-04-15T12:49:39+5:30

कोल्हापूर : हँडग्लोव्हज नसलेल्या ३९ भाजीविक्रेत्यांवर महापालिकेने मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी १०० प्रमाणे ३ हजार ९०० रुपये ...

... a permanent ban | ...तर कायमची बंदी-: दुसऱ्यांदा सापडल्यास थेट व्यवसाय बंदी - कोल्हापूर  महापालिकेची कारवाई

...तर कायमची बंदी-: दुसऱ्यांदा सापडल्यास थेट व्यवसाय बंदी - कोल्हापूर  महापालिकेची कारवाई

Next
ठळक मुद्दे हँडग्लोव्हज नसलेल्या ३९ भाजीविके्रत्यांना दंडकोल्हापूर  महापालिकेची कारवाई : ३ हजार ९०० दंड वसूल

कोल्हापूर : हँडग्लोव्हज नसलेल्या ३९ भाजीविक्रेत्यांवर महापालिकेने मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी १०० प्रमाणे ३ हजार ९०० रुपये वसूल केले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. दोन वेळा हँडग्लोव्हज घातले नसल्याचे आढळून आल्यास त्यांना थेट व्यवसाय करण्यासच बंदी घालण्यात येणार आहे.

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भाजी विक्री करताना सोशल डिस्टन्स ठेवून विक्री करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर भाजी विकताना तोंडाला मास्क, हातामध्ये हँडग्लोव्हज घालणे बंधनकारक आहे. परंतु शहरामध्ये गेले तीन दिवस कारवाई होऊनही मास्क, हँडग्लोव्हज न घालताच भाजी विक्री केली जात आहे. अशांवर भरारी पथकाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी सिद्धाळा गार्डन, हुतात्मा पार्क, कसबा बावडा मार्केट, सी. पी. आर. चौक परिसर या ठिकाणी हँडग्लोव्हज न घालता भाजी विक्री करणाऱ्यांवर पथकाने दंडात्मक कारवाई केली. यावेळी आरोग्य निरीक्षक गीता लखन, आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील व कर्मचारी उपस्थित होते.

...तर कायमची बंदी
महापालिकेच्या वतीने शहरातील भाजीविके्रत्यांनी हँडग्लोव्हज व मास्क न घातल्यास कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे. तसेच एकदा दंड झालेला भाजी विक्रेता पुन्हा हँडग्लोव्हज व मास्क न घालता आढळल्यास त्यांना कायमस्वरूपी भाजीविक्रीस बंदी घालण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आरोग्य निरीक्षक व इस्टेट आॅफिसर यांना दिले.
 
हँडग्लोव्हज नसलेल्या ३९ भाजीविके्रत्यांना दंड

महापालिकेची कारवाई : ३ हजार ९०० दंड वसूल : दुसऱ्यांदा सापडल्यास थेट व्यवसाय बंदी

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : हँडग्लोव्हज नसलेल्या ३९ भाजीविक्रेत्यांवर महापालिकेने मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी १०० प्रमाणे ३ हजार ९०० रुपये वसूल केले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. दोन वेळा हँडग्लोव्हज घातले नसल्याचे आढळून आल्यास त्यांना थेट व्यवसाय करण्यासच बंदी घालण्यात येणार आहे.
आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भाजी विक्री करताना सोशल डिस्टन्स ठेवून विक्री करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर भाजी विकताना तोंडाला मास्क, हातामध्ये हँडग्लोव्हज घालणे बंधनकारक आहे. परंतु शहरामध्ये गेले तीन दिवस कारवाई होऊनही मास्क, हँडग्लोव्हज न घालताच भाजी विक्री केली जात आहे. अशांवर भरारी पथकाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी सिद्धाळा गार्डन, हुतात्मा पार्क, कसबा बावडा मार्केट, सी. पी. आर. चौक परिसर या ठिकाणी हँडग्लोव्हज न घालता भाजी विक्री करणाऱ्यांवर पथकाने दंडात्मक कारवाई केली. यावेळी आरोग्य निरीक्षक गीता लखन, आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील व कर्मचारी उपस्थित होते.

...तर कायमची बंदी
महापालिकेच्या वतीने शहरातील भाजीविके्रत्यांनी हँडग्लोव्हज व मास्क न घातल्यास कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे. तसेच एकदा दंड झालेला भाजी विक्रेता पुन्हा हँडग्लोव्हज व मास्क न घालता आढळल्यास त्यांना कायमस्वरूपी भाजीविक्रीस बंदी घालण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आरोग्य निरीक्षक व इस्टेट आॅफिसर यांना दिले.
--------------------------------------------
विनोद

Web Title: ... a permanent ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.