सनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला

By admin | Published: September 19, 2015 12:37 AM2015-09-19T00:37:29+5:302015-09-19T00:39:52+5:30

मुस्लिम संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

Permanently ban on Sanatan Sanstha | सनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला

सनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घाला

Next

शिरोळ : राष्ट्रीय कामगार नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांची हत्या करणाऱ्या संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या खुनी हल्ल्यातील संशयित आरोपी समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा साधक आहे. या सनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशा मागणीचे निवेदन मुस्लिम हक्क संघर्ष समितीच्यावतीने येथील तहसीलदार सचिन गिरी यांना शुक्रवारी देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, पुरोगामी विचार चळवळीचा व ऐतिहासिक वारसा असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात पुरोगामी चळवळ रोखण्याचा प्रयत्न झाल्यास जनता कदापि सहन करणार नाही. सनातन ही संस्था धार्मिक द्वेष पसरवणारी व बहुजन समाजातील तरुणांची माथी भडकावणारी कट्टरवादी संघटना आहे. कामगार नेते गोविंदराव पानसरे यांच्यावर खुनी हल्लाप्रकरणी संशियत आरोपी म्हणून सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सनातन संस्थेवर कायमस्वरूपी बंदी आणावी, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी तहसीलदार गिरी यांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून शासनास त्वरीत भावना कळवू, असे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष अस्लम मुल्ला, उपाध्यक्ष अरिफ मुजावर, मुबारक बागवान, मेहबूब बागवान यांच्यासह राजेंद्र प्रधान, कमरोद्दीन पटेल, दलित सेनेचे सुनील कुरुंदवाडे, जमीर नदाफ, दिगंबर सकट, खंडेराव हेरवाडे होते. (प्रतिनिधी)

Web Title: Permanently ban on Sanatan Sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.