corona virus : शाळा उघडण्यास परवानगी; पालकांची वाढली धाकधूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 12:23 PM2021-11-29T12:23:44+5:302021-11-29T12:31:21+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप पूर्णपणे कमी झालेला नसल्याने आणि त्यातच नव्या ‘ओमीक्रॉन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक नियमावली लागू केल्याने आई-बाबाची धाकधूक वाढली आहे.

Permission to open schools Increased pressure from parents | corona virus : शाळा उघडण्यास परवानगी; पालकांची वाढली धाकधूक!

corona virus : शाळा उघडण्यास परवानगी; पालकांची वाढली धाकधूक!

googlenewsNext

संतोष मिठारी

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळेत जायला मिळाले नसल्याने इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची मुले कंटाळली आहेत; मात्र आता राज्य शासनाने बुधवार (दि. १ डिसेंबर) पासून पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन भरविण्यास परवानगी दिली आहे; पण कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप पूर्णपणे कमी झालेला नसल्याने आणि त्यातच नव्या ‘ओमीक्रॉन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक नियमावली लागू केल्याने आई-बाबाची धाकधूक वाढली आहे.

ऑनलाइन आणि समूह अध्यापनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. विद्यार्थी संख्या कमी असलेल्या गावांमध्ये पाचवीपासूनचे वर्ग गेल्या चार महिन्यांपूर्वी सुरू झाले आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहर आणि जिल्ह्यात इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग भरविण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार शाळांकडून तयारी सुरू झाली आहे.

आता मज्जाच मजा

कोरोनामुळे मला शाळेत जाता आले नाही. आता शाळेत जायला मिळणार असल्याने चांगले वाटत आहे. -प्रगती हेंबाडे, इयत्ता पहिली.

माझी शाळा सुरू झाली आहे. आता इतर मुलांची शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे मजा येणार आहे. -सिद्धार्थ कदम, इयत्ता दुसरी.

शाळेत जायला मिळणार असल्याने मला आनंद वाटत आहे. बाबांनी मला कपडे, दप्तर नवीन आणले आहे. -स्वरूप तोरस्कर, इयत्ता पहिली

आई-बाबाची काळजी वाढली

शाळा सुरू होणे चांगले आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन मुलांकडून होईल यादृष्टीने शाळा आणि पालकांना काळजी घेणे आवश्यक आहे. -दीपक पाटील

वर्ग प्रत्यक्षात सुरू होणार असल्याने मुलांच्या शिक्षणाला गती मिळणार आहे; पण कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला नसल्याने थोडी भीतीही वाटत आहे. -अपर्णा सुतार

मुलांच्या शिक्षणाच्यादृष्टीने पाहता शाळा सुरू करणे योग्य आहे; मात्र नवा विषाणूमुळे पुन्हा आमची धाकधूक वाढली आहे. -दीपाली पोतदार
 


जिल्ह्यात ऑनलाइन आणि समूह अध्यापनाच्या माध्यमातून शाळा सुरू आहेत. शासनाने १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत दिलेल्या निर्देशानुसार शाळांना सूचना केल्या आहेत. जास्त पट असलेल्या ठिकाणी एक दिवस आड आणि कोरोना नियमांचे पालन करत वर्ग भरविण्याबाबत सूचना शाळांना दिल्या आहेत. -जयश्री जाधव, उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग.

जिल्ह्यातील शाळा आणि विद्यार्थी

जिल्ह्यातील एकूण शाळा : ३७१५
शासकीय शाळा : २१२०

खासगी शाळा : १५९५
पहिली : ५५३०१

दुसरी : ५७४५२
तिसरी : ५७६०९

चौथी : ५७८३४
पाचवी :५७८४१

सहावी : ५७३९५
सातवी : ५८३२०

आठवी : ५८८००
नववी : ६०२२६

दहावी : ५९४०१

Web Title: Permission to open schools Increased pressure from parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.