तावडे हॉटेलप्रकरणी याचिका दाखल होणार

By admin | Published: June 21, 2014 12:40 AM2014-06-21T00:40:55+5:302014-06-21T00:42:41+5:30

‘कॉमन मॅन’ जनआंदोलन उभारणार : तावडे हॉटेल अतिक्रमणांवर ‘लोकमत’चा प्रकाशझोत

The petition will be filed against Tawde Hotel | तावडे हॉटेलप्रकरणी याचिका दाखल होणार

तावडे हॉटेलप्रकरणी याचिका दाखल होणार

Next

कोल्हापूर : महापालिकेच्या गांधीनगर परिसरातील स्वमालकीच्या जागेवर अतिक्रमणे झाली असून, दोन दिवसांच्या अतिक्रमण हटाव कारवाईनंतर न्यायालयीन कचाट्यात सापडलेल्या मोहिमेच्या कारवाईबाबत ‘लोकमत’ने या संपूर्ण प्रकरणातील अंतर्गत घडामोडींवर प्रकाशझोत टाकला. त्यामुळे न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा या प्रकरणाचा तड लावण्यासाठी वैयक्तिक जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती माजी नगरसेवक अनिल कदम यांनी दिली आहे. तर ‘कॉमन मॅन’ संघटनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तावडे हॉटेल अतिक्रमण कारवाई करताना न्यायालयात स्थगिती मिळू नये, यासाठी शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत कारवाईचा धडाका लावणे गरजेचे होते. मात्र, ऐन कामकाजादिवशीच कारवाई करत बचावाची संधी प्रशासनाने उपलब्ध करून दिली. बचाव करण्यासाठी महापालिकेतील अधिकारी व कारभाऱ्यांची एक फळी राबत असल्याचे पुढे आले आहे. तावडे हॉटेलप्रकरणी संपूर्ण घडामोडींवर ‘लोकमत’ने ‘भूखंड लाटणारे बोके’ अशा मथळ्याखाली रोखठोख प्रकाश टाकला. याप्रकरणी अनेक सामाजिक संस्थांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
 

Web Title: The petition will be filed against Tawde Hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.