पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा शेती मशागत कामांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:29 AM2021-02-25T04:29:30+5:302021-02-25T04:29:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सावरवाडी : जानेवारी महिन्यापासून पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढू लागल्या आहेत. याचा शेती व्यवसायावर परिणाम जाणवू ...

Petrol, diesel price hike hurts agriculture | पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा शेती मशागत कामांना आर्थिक फटका

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा शेती मशागत कामांना आर्थिक फटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सावरवाडी : जानेवारी महिन्यापासून पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढू लागल्या आहेत. याचा शेती व्यवसायावर परिणाम जाणवू लागला असून, ऊस पिकाची नांगरटी करणे, भरणी करणे यांच्या दरात वाढ झाली आहे. सध्या शेती मशागतीचे वाहनधारकांनी दर वाढविल्याने शेती मशागतीच्या कामांचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे. शेती व्यवसायाचे आर्थिक गणित यामुळे विस्कटले आहे.

ट्रॅक्टर, रोटावेटर या वाहनांच्या साह्याने होणारी शेतीच्या मशागतीची कामेही महागडी झाली आहेत. मालवाहतुकीच्या दरातही वाढ झाली आहे. ग्रामीण भागात वाहनधारकांनी शेती मशागतीच्या कामांमध्ये दरवाढ केली आहे. शेती व्यवसायाच्या मशागतीचे दर भडकल्याने शेतकऱ्यांना आता जादा पैसे मोजावे लागत आहेत.

वाढत्या महागाईच्या काळात सध्या शेती व्यवसायासमोर अनंत प्रश्न उभे आहेत. शेती मशागतीच्या दरवाढीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. एकीकडे साखर कारखान्यांची ऊस बिले वेळवर मिळत नाहीत तर दुसरीकडे शेतीच्या मशागत कामांना पैसे उपलब्ध होत नाहीत. याचा परिणाम म्हणून शेतीचे आर्थिक गणित विस्कटले आहे.

चालू ऊस गळित हंगामात ऊसाची बिले दोन-दोन महिने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होत नाहीत. सध्या आर्थिक गणित बिघडल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेती व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे.

शेतीसाठी ट्रॅक्टर भाड्याचे वाढलेले दर

१ ) पलटी फाळ नांगरटी करणे - एकरी चार हजार रुपये

२ ) रोटर मारणे - प्रति गुंठा शंभर रुपये

३ ) किरकोळ मालवाहतूक करणे - दोनशे रुपये प्रति खेप

४ ) मुरुम एक खेप - चारशे रुपये

लहान रोटावेटरचे वाढलेले दर !

१ ) खोडवा नांगरटी - प्रतिगुंठा एकशे दहा रुपये

२ ) ऊसभरणी करणे - प्रतिगुंठा शंभर रुपये

जेसीबीचे वाढलेले दर १ ) जमीन दुरुस्ती करणे - ताशी नऊशे रुपये

२ ) चर खोदाई - ताशी एक हजार रुपये

कोट

शेती परवडत नाही !

शेती व्यवसायामध्ये अगोदर पैसे गुंतवावे लागतात. इंधनाच्या किमती वाढल्याने शेती मशागतीचे दर वाढले आहेत. शेतीचा खर्च वाढल्याने सध्या शेती आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

भगवानराव सूर्यवंशी ( प्रगतशील शेतकरी, कसबा बीड )

Web Title: Petrol, diesel price hike hurts agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.