पेट्रोल-डिझेल विक्रीत ८५ टक्क्यांनी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:23 AM2021-05-17T04:23:52+5:302021-05-17T04:23:52+5:30
जिल्ह्यात ३१५ हून अधिक पेट्रोलपंप आहेत. या पंपांद्वारे नियमित दिवशी ५ लाख ५० हजार लिटर पेट्रोल, तर ६ लाख ...
जिल्ह्यात ३१५ हून अधिक पेट्रोलपंप आहेत. या पंपांद्वारे नियमित दिवशी ५ लाख ५० हजार लिटर पेट्रोल, तर ६ लाख ६० हजार लिटर डिझेल विकले जाते. मात्र, संचारबंदी लागू झाल्यानंतर हा खप ५० टक्क्यांनी घटला आहे. त्यात आता जिल्हा प्रशासनाने कडक लाॅकडाऊन रविवारपासून जिल्हाभरात लागू केला. त्यामुळे सर्वसामान्यांना आता पेट्रोल, डिझेल या पंपांद्वारे मिळत नाही. त्यामुळे दिवसभरात केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच ही विक्री झाली. त्यात १५ टक्के म्हणजेच पेट्रोल ८२ हजार ५००, तर डिझेल ९९ हजार लिटर खपले. आठ दिवसांचा हा लाॅकडाऊन असल्यामुळे इंधन खपात आणखी घट होण्याची जाणकारांनी शक्यता व्यक्त केली आहे.
कोट
लाॅकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही इंधन पुरवठा करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने सर्व पंपचालकांना दिले आहेत. त्यामुळे दिवसभरात इंधन विक्रीत सुमारे ८५ टक्क्यांहून अधिकची घट झाली.
गजकुमार माणगावे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्राेल, डिझेल डिलर असोसिएशन.