अंगावर पेट्रोल टाकून जाळून युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 11:38 AM2019-03-04T11:38:55+5:302019-03-04T11:45:05+5:30
सातारा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पिरवाडी येथे युवकाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देऊन त्याचा निघृर्ण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली.
सातारा: शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पिरवाडी येथे युवकाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देऊन त्याचा निघृर्ण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली.
जिल्हा परिषदेला लागूनच असलेल्या पिरवाडी येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पिरवाडी येथे जाणाऱ्या रस्त्याकडेला मोकळी जागा आहे. या ठिकाणी झाडे-झुडपे वाढलेली आहेत. याच ठिकाणी काही नागरिकांना एक युवक जळालेल्या अवस्थेत दिसला. यानंतर याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलीस अधिकारी, कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
संबंधित मृत युवक पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पोलिसांना अद्याप पटविता आली नाही. मृतदेहाशेजारी पोलिसांना मोबाईल सापडला असून, त्याच्या मोबाईलचीही पूर्णपणे तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांना मोबाईलचा केवळ ह्यईएमआयह्ण नंबर सापडला आहे. यानंबरवरूनच संबंधित मृत युवकाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.
मृत युवक आजूबाजूच्या परिसरातील असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा खून नेमक्या कोणत्या कारणातून व कशासाठी झाला, हे मृत युवकाची ओळख पटल्यानंतरच समोर येणार आहे.
पोलिसांची आठ पथके तैनात...
सातारा शहराचाच भाग असलेल्या पिरवाडी परिसरात खुनाचा प्रकार घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या परिसराला लागूनच अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे याची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या खुनाचा तत्काळ छडा लागावा, यासाठी तातडीने पोलिसांची आठ पथके तैनात केली आहेत. प्रत्येक टीमला वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली असून, काही तसांतच या प्ररणाचा छडा लावला जाईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.