पेट्रोल ९० रुपयांवर येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 10:37 AM2021-03-07T10:37:06+5:302021-03-07T10:39:51+5:30

Petrol Kolhapr- पेट्रोल दरात राज्य शासनाकडून एक ते दोन , तर केंद्र सरकारकडून सात ते आठ रुपये कमी होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.

Petrol is likely to come at Rs 90 | पेट्रोल ९० रुपयांवर येण्याची शक्यता

पेट्रोल ९० रुपयांवर येण्याची शक्यता

Next
ठळक मुद्देपेट्रोल ९० रुपयांवर येण्याची शक्यता, सर्वसामान्यांचा वाढता रोष राज्य शासन दर कमी करण्याची शक्यता

कोल्हापूर : पेट्रोल दरात राज्य शासनाकडून एक ते दोन , तर केंद्र सरकारकडून सात ते आठ रुपये कमी होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे भाव अक्षरश: गगनाला भिडले होते. त्यामुळे सर्वसामान्यांसह मालवाहतुकदार, रिक्षाचालक, टॅक्सीचालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंसह भाजीपाला, कडधान्ये, तेल आदींवर झाला आहे.

सर्वसामान्यांचा वाढता रोष पाहून राज्य शासनाने सोमवारी (दि.८) इंधनावरील कर एक ते दोन रुपयांनी, तर केंद्र शासन ७ ते ८ रुपयांनी दर कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल ९७.५५ रुपयांचे नव्वद रुपयांवर, तर डिझेल ८३.९९ रुपये प्रतिलिटर आहे. ७६ रुपयांवर येईल.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव प्रति बॅरेल कमी आहेत. मात्र, कराचा अतिरिक्त बोजा टाकून पेट्रोल भाव ९७.५५, तर डिझेल ८३.९९ इतके प्रतिलिटर झाले आहे. ही वाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे रोष वाढू लागला आहे. याची जाणीव केंद्र सरकारला झाल्यामुळे हे दर आता कमी होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.


गेले काही दिवसांपासून राज्य व केंद्र सरकारच्या करांमुळे इंधन दरात वाढ होऊ लागली आहे. ही वाढ आता कमी होईल. याबाबत एक दोन दिवसांत निर्णय अपेक्षित आहे.
-गजकुमार माणगावे,
अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल, डिझेल डिलर असोसिएशन

Web Title: Petrol is likely to come at Rs 90

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.