कोरोना काळात फार्मासिस्टची कामगिरी कौतुकास्पद - आमदार विनय कोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:28 AM2021-08-28T04:28:47+5:302021-08-28T04:28:47+5:30

वारणानगर : फार्मासिस्ट आपल्या सेवेच्या माध्यमातून कायमच समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतात. कोरोना महामारीच्या काळात कोल्हापूर केमिस्ट अँड ...

Pharmacist's performance during Corona period is commendable - MLA Vinay Kore | कोरोना काळात फार्मासिस्टची कामगिरी कौतुकास्पद - आमदार विनय कोरे

कोरोना काळात फार्मासिस्टची कामगिरी कौतुकास्पद - आमदार विनय कोरे

Next

वारणानगर : फार्मासिस्ट आपल्या सेवेच्या माध्यमातून कायमच समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतात. कोरोना महामारीच्या काळात कोल्हापूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून झालेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.

योग्यवेळी औषधांची उपलब्धता झाल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचल्याचे आमदार डॉ. विनय कोरे केले.

वारणा सायन्स अँड इनोवेशन ॲक्टिव्हिटी सेंटर आणि मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी विज्ञानवारी उपक्रमांतर्गत ग्रामीण दुर्गम भागातील शाळांमध्ये विज्ञान प्रसाराचे काम करणाऱ्या विज्ञानदुतांचा तसेच कोल्हापूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभात कोरे बोलत होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा यांनी फार्मासिस्टचे समाजातील महत्त्व अधोरेखित करताना कोरोना काळामध्ये केलेल्या एकूणच कार्याची आठवण करून देत असताना फार्मासिस्टचा कोविड योद्धा म्हणून उल्लेख होत नसल्याची खंत व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी बदलत्या काळानुसार सुधारित शिक्षणपद्धतीसह कौशल्यपूर्ण फार्मासिस्ट घडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय संघटनेचे संघटन सचिव मदन पाटील, रवींद्र पाटील, नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी ढेंगे, प्रल्हाद खवरे, भरतेश कळंत्रे, सचिन पुरोहित, भुजंगराव भांडवले, संदीप मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला.

प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांनी स्वागत केले.

यावेळी ॲड. राजेंद्र पाटील, फार्मासिस्ट, विज्ञानदूत, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. प्रा. सुप्रिया गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

.

फोटो ओळ-तात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेजच्यावतीने कोल्हापूर केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा व विज्ञानदूतांचा सत्कार आमदार डॉ. विनय कोरे यांच्याहस्ते झाला. यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. जॉन डिसोझा, विजय पाटील, मदन पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Pharmacist's performance during Corona period is commendable - MLA Vinay Kore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.