राज्य नाट्यमध्ये फिनिक्सचा ह्येच्या आईचा वग प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 03:04 PM2019-12-17T15:04:11+5:302019-12-17T15:10:55+5:30
५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर या केंद्रातून फिनिक्स क्रिएशन्सच्या ‘ह्येच्या आईचा वग’ या नाटकाने प्रथम पारितोषिकमिळविले. संस्थेला सलग पाच वर्षे तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र ‘नर्व्हस थ्रीचा रेकॉर्ड ब्रेक’ यांनी प्रथम स्थान पटकाविले. इचलकरंजीच्या रंगयात्रा संस्थेच्या ‘हुज अफ्रेड आॅफ द व्हर्जिनिया वुल्फ’ या नाटकाला दुसरा क्रमांक मिळाला असून, या दोन्ही संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
कोल्हापूर : ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर या केंद्रातून फिनिक्स क्रिएशन्सच्या ‘ह्येच्या आईचा वग’ या नाटकाने प्रथम पारितोषिकमिळविले. संस्थेला सलग पाच वर्षे तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र ‘नर्व्हस थ्रीचा रेकॉर्ड ब्रेक’ यांनी प्रथम स्थान पटकाविले. इचलकरंजीच्या रंगयात्रा संस्थेच्या ‘हुज अफ्रेड आॅफ द व्हर्जिनिया वुल्फ’ या नाटकाला दुसरा क्रमांक मिळाला असून, या दोन्ही संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
रुद्राक्ष अकॅडमी, कोल्हापूर या संस्थेच्या ‘मोठ्यांचा शेक्सपियर’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले आहे. अन्य विभागांतील निकाल पुढीलप्रमाणे-दिग्दर्शन (अनुक्रमे प्रथम, द्वितीय) संजय मोहिते (नाटक- ह्येच्या आईचा वग), निरुद्ध दांडेकर (नाटक- हुज अफ्रेड आॅफ द व्हर्जिनिया वुल्फ), प्रकाश योजना : विनायक रानभरे (हुज अफ्रेड आॅफ द व्हर्जिनिया वुल्फ), तेजस कोळी (मोठ्यांचा शेक्सपिअर), नेपथ्य : अमोल नाईक (ह्येच्या आईचा वग), प्रवीण लायकर (हुज अफ्रेड आॅफ द व्हर्जिनिया वुल्फ), रंगभूषा : ओंकार पाटील (तुघलक), सुनीता वर्मा (युद्ध नको मज बुद्ध हवा).
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक : सचिन वाडकर (ह्येचा आईचा वग) व कादंबरी माळी हुज अफ्रेड आॅफ द व्हर्जिनिया वुल्फ), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे तेजस्विनी सोनसाळे (वृंदावन), प्रतीक्षा गवस (पुरूष), वैदेही सावंत (नटरंग), पूर्वा कोडोलीकर (ऐश्वर्या ब्युटी पार्लर), उज्ज्वला खांडेकर शहा (ऊन-पाऊस), परसु गावडे (विच्छा माझी पुरी करा), युवराज केळूसकर (तुघलक), निहाल रोकडीकर (मोठ्यांचा शेक्सपिअर), रोहित पोतनीस (अंदाधुंद), सतीश तांदळे (देव हरवला)
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात १५ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०१९ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत एकूण २८ नाट्यप्रयोग सादर झाले. परीक्षक म्हणून प्रा. मधु जाधव, मुकुंद हिंगणे, गौरी लोंढे यांनी काम पाहिले.
आजचा आनंद माझ्यासाठी अवर्णनीय असा आहे. पाच वर्षे आम्ही राज्य नाट्यमध्ये तिसºया क्रमांकावर होतो; त्यामुळे अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकत नव्हतो. यावेळी नव्या दमाची मुलं घेऊन नाटक बसवलं. अभिनय, नेपथ्य, प्रकाश, संगीत, रंग-वेशभूषा या सगळ्या पातळ्यांवर त्यांनी प्रामाणिकपणे आपली भूमिका निभावली. आम्ही केलेल्या टीम वर्कचे हे फलित आहे.
संजय मोहिते (दिग्दर्शक)