कळेतील ७ विद्यार्थ्यांचा पोस्ट तिकिटावर फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:52 AM2021-09-02T04:52:07+5:302021-09-02T04:52:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कळे : जागतिक संविधान संघ यांच्यामार्फत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. ...

Photo of 7 art students on postage stamp | कळेतील ७ विद्यार्थ्यांचा पोस्ट तिकिटावर फोटो

कळेतील ७ विद्यार्थ्यांचा पोस्ट तिकिटावर फोटो

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कळे :

जागतिक संविधान संघ यांच्यामार्फत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. कळे ( ता. पन्हाळा) येथील लिम्का बुक ऑफ वर्ल्ड विजेते सुरेश सुतार व त्यांच्या टीमने जगातील सर्वात मोठा मॅजिक स्क्वेअर बनविण्याचा प्रयत्न केला. मॅजिक स्क्वेअर टीमच्या सदस्यांमध्ये कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज कळे या प्रशालेतील ७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

भारत सरकारच्या माय स्टॅम्प या योजनेअंतर्गत चलनामधील ५ रुपयांच्या पोस्ट तिकिटामध्ये मॅजिक स्क्वेअर बनविणाऱ्या टीमच्या सदस्यांमधील या ७ विद्यार्थ्यांचा समावेश झाला आहे. या सर्वांचा फोटो चलनामधील ५ रुपयांच्या पोस्ट तिकिटावरती झळकल्याने कळेसह परिसरात आनंद व्यक्त होत आहे.

यामध्ये सोनाली राजेंद्र पाटील, श्रुतिका सुरेश सुतार, अश्विनी निवास सुतार, सायली बाजीराव पाटील, कु. स्वराज संभाजी सुतार, कु. सिद्धी गणेश सुतार, कु. श्रेया अमर इंजुळकर यांचा समावेश आहे.

हरिनारायण सांस्कृतिक हॉल याठिकाणी झालेल्या कार्यक्रमात लिम्का बुक ऑफ वर्ल्ड विजेते व जागतिक संविधान संघाचे आंतरराष्ट्रीय सदस्य सुरेश सुतार यांच्या हस्ते या पोस्ट तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास कळेचे सरपंच सुभाष पाटील, प्रवीण कुंभार, धनाजी इंजुळकर, केशव देशमुख आदी उपस्थित होते.

फोटो मेल केला आहे -

फोटो ओळ - भारत सरकारच्या माय स्टॅम्प या योजनेअंतर्गत चलनामधील ५ रुपयांच्या पोस्ट तिकिटामध्ये मॅजिक स्क्वेअर बनविणाऱ्या टीममधील विद्यार्थिनींचा फोटो असणारे तिकीट.

३१ कळे मॅजिक पोस्ट

Web Title: Photo of 7 art students on postage stamp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.