फोटो फिचर : गायन समाज देवल क्लबची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:24 AM2021-02-10T04:24:05+5:302021-02-10T04:24:05+5:30
गायन समाज देवल क्लब परंपरा १८८३ पासूनची. संस्थेची इमारत गो.ब. देवल स्मारक म्हणून उभारली १९१८ साली. इमारतीचे उद्घाटन स्वत: ...
गायन समाज देवल क्लब परंपरा १८८३ पासूनची. संस्थेची इमारत गो.ब. देवल स्मारक म्हणून उभारली १९१८ साली. इमारतीचे उद्घाटन स्वत: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केले. या इमारतीत संगीतवर्ग सुरू झाले त्याचे चालू वर्ष हे शताब्दी वर्ष. अल्लादिया खॉसाहेब, गाेविंदराच टेंबे, केसरबाई केरकर यांच्यासह अनेक दिग्गजांच्या मैफलीत, तर या वास्तूत रंगल्याच; पण गुणीदास म्हणजे जगन्नाथबुवा पुरोहित यांचे काही काळ या वास्तूत वास्तव्यही होते. काळाच्या ओघात रस्ता रुंदीकरणात या वास्तूचा मूळ डौल लयाला गेला. संस्थेची नवी इमारत उभारण्याच्या प्रकल्पाने गती घेतली आणि हळूहळू मूळ वास्तू उपेक्षित बनत गेली. आयुष्याचे शतक पार केलेल्या, सांगीतिक वैभव अशी ओळख बनलेल्या या वास्तूची आजची स्थिती पाहून म्हणावे लागते, गेले ते दिन गेले.
फोटो ०९०२२०२१-कोल-देवल क्लब ०१, ०२, ०३, ०४, ०५
(छाया : आदित्य वेल्हाळ)