फोटोग्राफर्स (छायाचित्रकार???) ची स्माइल लॉकडाऊनमुळे हरवली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:17 AM2021-06-10T04:17:21+5:302021-06-10T04:17:21+5:30
देवाळे : 'रेडी, स्टेडी, स्माइल' म्हणत समोरील व्यक्तीच्या सुखद क्षणांना आपल्या कॅमेऱ्यात जन्मभरासाठी कैद करणाऱ्या ...
देवाळे : 'रेडी, स्टेडी, स्माइल' म्हणत समोरील व्यक्तीच्या सुखद क्षणांना आपल्या कॅमेऱ्यात जन्मभरासाठी कैद करणाऱ्या ??????????????? सध्या आहे. ऐन हंगामाच्या काळात व्यवसायावर कुऱ्हाड कोसळल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारकडून बारा बलुतेदारांपैकी काहींना सवलत दिली जात असताना आठवणींना फोटोत साठवून ठेवणाऱ्या फोटोग्राफरदेखील सरकारकडून थोडीफार सवलत मिळावी, अशी विनंती पन्हाळा पूर्व भागातील फोटोग्राफर वर्गातून होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन घोषित केले. यामुळे अनेकांच्या उद्योगधंद्यांवर विपरीत परिणाम घडला. हळूहळू उद्योगधंद्यांना सरकारकडून सवलत मिळू लागली आहे. मात्र फोटोग्राफरकडे कोणाचेही लक्ष गेलेले नाही. फोटोग्राफर, फोटो-व्हिडीओ अॅक्सेसरिज विक्रेता, कलर लॅब, व्हिडीओ एडिटर या सर्वांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सध्या विवाहाचा हंगाम आहे. या हंगामाची फोटोग्राफर्स प्रतीक्षा करत असतात. प्री-वेडिंग, मेहंदी रसम, हळद, गरबा आणि विवाह या मंगल कार्यक्रमांकरीता छायाचित्रकार व्यावसायिकांचे लाखापर्यंत पॅकेज ठरलेले असते. परंतु दोन महिन्यांपूर्वी कोरोनाने शहरासह ग्रामीण भागात दस्तक दिली आणि होत्याचे नव्हते झाले आणि लग्नसराई व्यवसायाला ग्रहण लागले. या सिझनमध्ये नियोजित उत्पनाची आशा या घटकाने बांधली होती. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व आशांवर पाणी फिरले आहे. थोड्या दिवसांनी परिस्थिती ठीक होईल या आशेत असतानाच लॉकडाऊनचा कालावधी वाढतच गेला. त्यामुळे ऐन भरात येणारा फोटोग्राफीचा हंगाम हातातून निसटला आहे. जवळचे साठवून ठेवलेले पैसेही आता संपले असल्याने आता या घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पन्हाळा पूर्ण भागातीत अंदाजे ४० ते ४५ व्यावसायिक फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर आहेत. वर्षभर स्टुडिओमधील किरकोळ व्यवसायानंतर त्यांना सीझनची प्रतीक्षा असते. तुळशीविवाहापासून लग्नसराईचे मुहूर्त अंदाजे जून-जुलैपर्यंत सुरू राहतात. या काळात फोटोग्राफर-व्हिडीओग्राफरला क्षणभराचीही उसंत नसते. वर्षभराची कमाई या काळातच होत असल्याने त्यांचे काम जोमाने चालते. परंतु यंदा त्यांचे शटर खाली असल्याने कमाईचे सर्व स्रोत बंद झाले आहेत.