स्वच्छता अभियानात एक टन कचरा उठाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:21 AM2021-03-15T04:21:59+5:302021-03-15T04:21:59+5:30
कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये एक टन कचरा व प्लास्टिक गोळा केला. मोहिमेचा ९८ वा रविवार असून या ...
कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये एक टन कचरा व प्लास्टिक गोळा केला. मोहिमेचा ९८ वा रविवार असून या अभियानामध्ये
सामाजिक संघटना, संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनखाली मोहीम झाली.
उड्डाणपूल ते टेंबलाईवाडी मेनरोड, रंकाळा टॉवर परिसर, संभाजीनगर पेट्रोल पंप ते क्रशर चौक, बजापराव माने तालीम हॉल परिसर, रिलायन्स मॉल मागे, नाला परिसर, पंचगंगा नदी घाट व स्मशानभूमी परिसर, आंबेडकर उद्यान परिसर येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता मोहिमेत ३ जेसीबी, ३ डंपर, ६ आरसी गाड्या, १ ट्रॅक्टर ट्रॉली, ३ औषध फवारणीचा वापर करण्यात आला. महापालिकेचे १४० कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी स्वच्छतादूत अमित देशपांडे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर आदी उपस्थित होते.
फोटो : १४०३२०२१ केएमसी स्वच्छता मोहीम १
फोटो : १४०३२०२१ केएमसी स्वच्छता मोहीम २
ओळी : कोल्हापूर महापालिकेच्यावतीने रविवारी शहरात स्वच्छता माेहीम राबवण्यात आली.