विधानसभेला चित्र वेगळे असेल :रोहित पवार यांचे मत : मोदींकडे पाहून झाले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:56 PM2019-05-30T12:56:52+5:302019-05-30T13:09:14+5:30

लोकसभा निवडणुकीत लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मतदान केले आहे. तिथे पक्षीय विचार झाला नाही. तसे विधानसभेला होणार नसल्याने भाजप-शिवसेनेला त्या निवडणुकीत एवढे यश नक्की मिळणार नाही, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Picture of Vidhan Sabha will be different: Rohit Pawar's opinion: Polling was done by Modi | विधानसभेला चित्र वेगळे असेल :रोहित पवार यांचे मत : मोदींकडे पाहून झाले मतदान

विधानसभेला चित्र वेगळे असेल :रोहित पवार यांचे मत : मोदींकडे पाहून झाले मतदान

Next
ठळक मुद्देविधानसभेला चित्र वेगळे असेल :रोहित पवार यांचे मत मोदींकडे पाहून झाले मतदान

कोल्हापूर :  लोकसभा निवडणुकीत लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मतदान केले आहे. तिथे पक्षीय विचार झाला नाही. तसे विधानसभेला होणार नसल्याने भाजप-शिवसेनेला त्या निवडणुकीत एवढे यश नक्की मिळणार नाही, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत लोकांनी फक्त मोदी यांच्याकडे पाहून मतदान केले त्यामुळे भाजपला एवढे यश मिळाले. त्यामध्ये लोकांचे प्रश्न बाजूला पडले. प्रत्येक वेळी तसे घडणार नाही. विधानसभेला त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाही. मला प्रत्येक ठिकाणी ‘काय ठरलंय’ असे लोक विचारतात.

तूर्त माझे एवढंच ठरलंय की, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायची. पक्षाने विधानसभा निवडणूक लढवावी असे सांगितले तर त्यासाठीही माझी तयारी आहे. संघटनेत काम करून आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले तर त्यालाही माझी हरकत नाही.’
 

 

Web Title: Picture of Vidhan Sabha will be different: Rohit Pawar's opinion: Polling was done by Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.