Kolhapur News: जोतिबा डोंगरावर दुसऱ्या खेट्यासाठी भाविकांची झुंबड, चैत्र यात्रा कधी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 12:02 PM2023-02-20T12:02:39+5:302023-02-20T12:03:40+5:30

जोतिबा : श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर दुसरा रविवार खेटा धार्मिक वातावरणात पार पडला. दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची झुंबड उडाली होती. चांगभलंच्या ...

Pilgrimage of devotees for second village on Jotiba hill, Chaitra Yatra will be held on April 5 | Kolhapur News: जोतिबा डोंगरावर दुसऱ्या खेट्यासाठी भाविकांची झुंबड, चैत्र यात्रा कधी? जाणून घ्या

Kolhapur News: जोतिबा डोंगरावर दुसऱ्या खेट्यासाठी भाविकांची झुंबड, चैत्र यात्रा कधी? जाणून घ्या

googlenewsNext

जोतिबा : श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर दुसरा रविवार खेटा धार्मिक वातावरणात पार पडला. दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची झुंबड उडाली होती. चांगभलंच्या गजराने अवघी दख्खननगरी दुमदुमून गेली होती.

कोल्हापूर, वडणगे, निगवे, कुशिरे गायमुख तीर्थमार्गे पायी चालत खेटेकरी भाविक जोतिबा मंदिरात दाखल झाले. चांगभलंचा गजर करीत भाविकांनी दर्शन घेतले. चालत आलेल्या भाविकांना सेवाभावी संस्था मंडळे यांनी प्रसाद वाटप केला. सकाळी ९ वाजता पंचामृत अभिषेक झाला. मुख्य पुजारी यांच्या हस्ते अभिषेक झाला. जोतिबाची अलंकारीत खडी महापूजा बांधली. सकाळी ११ वाजता उंट, घोडे, वाजंत्री, देवसेवकांच्या लवाजम्यासह मंदिर प्रदक्षिणेसाठी धुपारती सोहळा निघाला. भाविकांनी गुलाल, खोबऱ्यांची उधळण करीत धुपारतीचे दर्शन घेतले. 

दुसऱ्या खेट्याला भाविकामुळे मंदिराबाहेर दर्शन रांगा लागल्या होत्या. दर्शन रांगेवर नियंत्रणासाठी देवस्थान समितीचे प्रभारी दीपक म्हेत्तर, कोडोली पोलिस स्टेशनचे सपोनि शीतलकुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी तैनात होते. दर्शन रांग व्यवस्थेसाठी गावकर, पुजारी समिती, स्वयंसेवक हजर होते. खाजगी वाहनातून भाविक जोतिबा डोंगरावर येत होते. रात्री ८ वाजता श्री जोतिबा देवाचा पालखी सोहळा निघाला. त्यात गुलाल, खोबऱ्यांची उधळण झाली.

५ एप्रिलला चैत्र यात्रा 

५ एप्रिलला चैत्र यात्रा होणार असून, यात्रेची नियोजन बैठक १ मार्चला पन्हाळचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली जोतिबा डोंगरावर होणार आहे. 

Web Title: Pilgrimage of devotees for second village on Jotiba hill, Chaitra Yatra will be held on April 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.