हेल्मेटसक्तीच्या कारवाईने वाहनधारकांची धावपळ
By admin | Published: June 30, 2017 05:56 PM2017-06-30T17:56:58+5:302017-06-30T17:56:58+5:30
वडणगे फाटा येथे शहर वाहतूक शाखेची नाकाबंदी
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ३0 : शहर वाहतूक नियंत्रण शाखा व पोलीसांनी दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीची मोहिम तीव्र केली आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करून हेल्मेट नसणाऱ्या वाहनधारकांवर प्रत्येकी ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली जात आहे. कारवाईची धास्ती घेतलेले दुचाकीस्वार शहरात येण्याच्या मार्गावरील पोलीसांना पाहून परत गावाकडे जात आहेत.
वडणगे फाटा येथे शुक्रवारी दोनशे ते अडीचशे दुचाकीस्वार थांबले होते. दंडाची पावती करावी लागते या धास्तीने अनेकजण गावाकडे निघून जाताना दिसत होते. दुचाकीवरून प्रवास करताना अपघातात डोक्याला जखमा होणे,गंभीर दुखापतीमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात साडे नऊ लाख दुचाकी आहेत. त्यामुळे शासनाने दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती केली आहे. त्याची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्हयात जोरदार सुरू आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने गेल्या दोन महिन्यांपासून आठवड्यातून तीन वेळा नाकाबंदी करून हेल्मेट नसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे.
नामवंत कंपनीचे चांगल्या दजार्चे हेल्मेट १५०० ते २००० रुपयांना विकत मिळते. मात्र पोलीसांच्या दंडात्मक कारवाईपासून बचाव करण्यासाठी वाहनधारक २५० ते ३५० रुपयांना रस्त्यावरील विक्रेत्यांकडून मिळणारे हेल्मेट खरेदी करून त्याचा वापर करीत आहेत. कमी दरात मिळणारी हेल्मेट दजार्हीन असून वाहनधारकाचे डोके सुरक्षीत रहावे हा हेतू त्यातून साध्य होत नाही. त्यामुळे वाहनधारकांनी कारवाईपार्सून बचाव करण्यासाठी दर्जाहिन हेल्मेट घेण्यापेक्षा नामवंत कंपनीची आयएसआय प्रमाणित हेल्मेट घ्यावीत अशी सक्ती पोलीसांकडून केली जात आहे.
शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धूमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शिवाजी पुल व पुलाच्या पलिकडे वडणगे फाटा येथे हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईला प्रारंभ केला. पुढे तपासणी मोहित सुरू आहे. हे लक्षात आल्यावर वाहनधारक पाठीमागे थांबत होते. दंडात्मक कारवाई होणार या धास्तीने दोनशे ते अडीचशे वाहनधारक एका ठिकाणी थांबल्यामुळे वाहतूक विस्कळीत तर झाली होती. अपघात झाल्यानंतर वाहधारकांची जशी धावपळ सुरू होते,तसे वातावरण या ठिकाणी झाले होते.
हेल्मेट नसलेल्या एकाही दुचाकीस्वारास पुढे सोडले जात नव्हते. या ठिकाणी कारवाई सुरू तावडे हॉटेल ते मार्केट यार्ड ,शिवाजी पूल ते आंबेवाडी फाटा, शिवाजी विद्यापीठ रोड, कळंबा ते कात्यायनी रोड, कसबा बावडा ते शिरोली, सानेगुरुजी वसाहत या मार्गावरही वाहतूक नियंत्रण विभाग व पोलीस ठाण्यातील पोलीसांनी कारवाई केली.
पोलीस कर्मचारी,शासकीय नोकर या सर्वांनाही या कारवाईतून सुटता आले नाही. सिट बेल्ट न वापरणे, लायसन्स व वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत होती. ५०० वाहनांवर कारवाई सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापूर शहरात नाकाबंदी करून पाचशे वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून दीड लाख रुपये दंड वसुल करण्यात आला. जोर्पत जिल्ह्यात सर्वच दुचाकीस्वार स्वत:हून हेल्मेट वापरत नाहीत, तोपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिका?्यांकडून सांगितले जात आहे.
वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी
कोल्हापूर शहरात वाहधारकांकडून नियमांचे उल्लंघन केले जाते. हेल्मेट वापरल्याने वाहधारकाच्या जीवाचे रक्षण होते. आमची कारवाई ही केवळ दंड वसुल करण्यासाठी नाही,तर वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी आहे. अपघात मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार मोहिम तीव्र केली आहे. अशोक धूमाळ पोलीस निरीक्षक,शहर वाहतूक शाखा.