कंपन्यांच्या एकतर्फी इंधन दर बदलाला पंपचालकांचा विरोध गजकुमार माणगावे
By admin | Published: June 10, 2017 02:05 PM2017-06-10T14:05:56+5:302017-06-10T14:05:56+5:30
जिल्ह्यातील सर्व पंप स्वयंचलित करा
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १0 : स्वयंचलित यंत्रे (आॅटो मायजेशन) सर्वच पेट्रोल पंपावर नसल्याने पेट्रोल व डिझेल दर दररोज बदलण्यास तांत्रिक अडचण येणार आहे. त्यामुळे पेट्रोल कंपन्यांनी घेतलेल्या या एकतर्फी निर्णयाला पंपचालकांचा विरोध राहील. अशी भूमिका पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी ‘लोकमत ’ शी बोलताना स्पष्ट केली.
इंधनाचा व्यवहार पारदर्शक रहावा म्हणून पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय १६ जूनपासून देशभरात लागू होणार आहे. पण या तेल कंपन्यांच्या एकतर्फी निर्णयाबद्दल पंपधारकांमध्ये तीव्र अंसतोष निर्माण झाला आहे.
यासंदर्भात असोसिएशनचे अध्यक्ष माणगावे यांच्याशी संर्पक साधला असता ते त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, दररोज दर कमी जास्त झाल्यानंतर ते बदलण्यासाठी पंपचालकांना रात्री १२ वाजता आॅटो मायजेशनद्वारे दर निश्चित केले जातात. मात्र, पंपांवर असे यंत्र उपलब्ध असल्यास ते तत्काळ बदलता येणार आहेत. तर ज्यांच्याकडे अजूनही असे यंत्र नाही त्यांना यात अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
जिल्ह्याचा विचार केला असता २६३ पंपप आहेत. त्यातील ६० टक्के पंपांवर आॅटो मायजेशन यंत्र आहेत. तर उर्वरित ४० टक्के पंपावर अद्यापही ही यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वत्र ही यंत्रणा कंपन्यांनी बसवल्यानंतर असा निर्णय घेतला असता तर योग्य होते.
कंपन्यांनी पंपचालकांची बैठक अथवा त्यांच्या समस्या जाणून न घेता हा निर्णय एकतर्फी घेतला आहे. त्यामुळे छोटे पंपचालक यात भरडले जाणार आहेत. त्यामुळे असोसिएशनचा या कंपन्यांचाय निर्णयाला विरोध आहे. विश्ेष म्हणजे पंपचालकांचा खरा व्यवसाय सेवा देणे आहे. यात तेजी मंदीचा कुठलाही धंदा हे पंपचालक करीत नाहीत. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार कंपन्यांनी करावा.