कोल्हापूर : पिंकथॉन’ च्या शेकडोजणी ‘लोकमत महामॅरेथॉन’ मध्ये धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 02:40 PM2018-12-20T14:40:09+5:302018-12-20T14:43:03+5:30

कुस्तीची परंपरा जोपासणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी व संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला सहा जानेवारी २०१९ रोजी होणाऱ्यां ज्या स्पर्धेचे वेध लागलेले आहे, त्या ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’च्या थरारामध्ये ‘पिंकथॉन गु्रप’च्या शेकडो महिलाही सहभागी होऊन धावणार आहेत. तर तुम्हीही मागे राहू नका. तुम्हीही सहभागी होऊ शकता. महामॅरेथॉनसाठी नावनोंदणी सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या सर्वांत मोठ्या हाफ मॅरेथॉनमधील सहभागाबाबत नागरिक, धावपटू, खेळाडूंना मोठी उत्सुकता आहे.

Pincthon's Shakeshow 'Lokmat Mahamarethon' will run in | कोल्हापूर : पिंकथॉन’ च्या शेकडोजणी ‘लोकमत महामॅरेथॉन’ मध्ये धावणार

कोल्हापूर : पिंकथॉन’ च्या शेकडोजणी ‘लोकमत महामॅरेथॉन’ मध्ये धावणार

Next
ठळक मुद्देपिंकथॉन’ च्या शेकडोजणी ‘लोकमत महामॅरेथॉन’ मध्ये धावणार ‘लोकमत महामॅरेथॉन’साठी नावनोंदणीचा अखेरचा दिवस

कोल्हापूर : कुस्तीची परंपरा जोपासणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी व संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला सहा जानेवारी २०१९ रोजी होणाऱ्यां ज्या स्पर्धेचे वेध लागलेले आहे, त्या ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’च्या थरारामध्ये ‘पिंकथॉन गु्रप’च्या शेकडो महिलाही सहभागी होऊन धावणार आहेत. तर तुम्हीही मागे राहू नका. तुम्हीही सहभागी होऊ शकता. महामॅरेथॉनसाठी नावनोंदणी सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या सर्वांत मोठ्या हाफ मॅरेथॉनमधील सहभागाबाबत नागरिक, धावपटू, खेळाडूंना मोठी उत्सुकता आहे.

औरंगाबाद आणि नाशिकमधील ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या प्रचंड यशानंतर आता कोल्हापूरमध्ये दुसºयांदा यावर्षी महामॅरेथॉन रंगणार आहे. ही मॅरेथॉन २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० किलोमीटर पॉवर रन, ५ किलोमीटर फन रन आणि ३ किलोमीटर फॅमिली रन अशा अंतराची असणार आहे. त्यातील विजेत्यांना मेडल आणि रोख रकमेच्या स्वरूपातील बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

‘लोकमत’ने कोल्हापूरकरांसह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक, क्रीडाप्रेमींसाठी या महामॅरेथॉनच्या माध्यमातून एक चांगली संधी उपलब्ध करून दिली असल्याची भावना विविध क्षेत्रांतील मान्यवर, खेळाडू आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कोल्हापूरमधील शासकीय अधिकारी, नामवंत डॉक्टर्स, वकील, अभियंते आदींनी या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. महामॅरेथॉनमधील सहभागाबाबत कोल्हापूरकरांसह खेळाडू, धावपटूंमध्ये मोठी उत्सुकता आहे.

‘पिंकथॉन गु्रप’ बद्दल

आरोग्याबाबत महिलांमध्ये जागृती निर्माण व्हावी. या उद्देशाने देशपातळीवर अभिनेता व फिटनेस गुरू मिलिंद सोमण, अजित पाठक, वैष्णवी नायक यांनी दोन वर्षांपूर्वी ‘पिंकथॉन’ नावाच्या महिलांकरिता खास गु्रपची स्थापना केली. यात महिलांकरिता देशभरातील प्रमुख शहरांमध्ये पिंकथॉन वूमेन रनही आयोजित करण्यात आली होती.

त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात ही रन आयोजित करण्यात आली होती. त्यात शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यात शीतल संघवी, गीता लालवाणी, सुमित्रा खानविलकर, वैशाली संघवी, आरती संघवी, मंजिरी हसबनीस, रूपाली नांगरे-पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले होते. याच गु्रपमधील शेकडो महिला सहा जानेवारीला कोल्हापुरात होणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी होत आहेत.


शहराचा नकाशा असणारे मिळणार ‘मेडल’

या मॅरेथॉनमधील १० आणि २१ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक धावपटूला कोल्हापूरचा नकाशा असलेले मेडल्स देण्यात येणार आहे. नाशिक आणि औरंगाबाद येथे झालेल्या मॅरेथॉनमधील धावपटूंना त्या-त्या शहराचा नकाशा असणारे मेडल्स दिली आहेत.

धावपटूने औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि पुणे, नागपूरमधील मॅरेथॉन पूर्ण करून मिळविलेली मेडल्स जुळवल्यास आपल्या ‘महाराष्ट्रा’चा नकाशा बनणार आहे. या पाच शहरांमधील मॅरेथॉन जिंकून हे मेडल्स् पटकाविणारा धावपटू हा ‘महामॅरेथॉनर’ ठरणार आहे.


महामॅरेथॉनसाठी नोंदणीचा आज शेवट

‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वासाठी धुमधडाक्यात नोंदणी सुरू झाली आहे. कोल्हापुरात गेल्या वर्षी ‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद लाभला. आबालवृद्ध तंदुरुस्त राहावेत, या हेतूने यावर्षी आयोजित केलेली ही महामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त धावण्याचा छंद असणाºयांसाठी), १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ पेक्षा जास्त) असणार आहे. त्यात फॅमिली रन तीन किलोमीटर अंतराची असणार आहे. ती सर्वच वयोगटांसाठी खुली असणार आहे. त्याचप्रमाणे लष्कर, पोलीस दलातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवला आहे. विदेशातील स्पर्धकांनाही या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. या मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत आज, दि. २० डिसेंबरपर्यंत आहे.

नावनोंदणीसाठी संपर्क

या महामॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत. महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर, मोबाईल नंबर (रोहन भोसले) ९६०४६४४४९४, ९८८१८६७६०० वर नोंदणी करता येणार आहे.
 

 

Web Title: Pincthon's Shakeshow 'Lokmat Mahamarethon' will run in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.