पिंकेश ठक्कर, कोंडेदेशमुख ‘बेस्ट रायडर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:20 AM2018-05-14T00:20:42+5:302018-05-14T00:20:42+5:30

Pinkesh Thakker, Kondesameshukh 'Best Rider' | पिंकेश ठक्कर, कोंडेदेशमुख ‘बेस्ट रायडर’

पिंकेश ठक्कर, कोंडेदेशमुख ‘बेस्ट रायडर’

Next


कोल्हापूर : वेड्यावाकड्या आणि निसरड्या वळणांवर वाऱ्याच्या वेगाने धावणाºया दुचाकींचा आवाज, आबालवृद्ध प्रेक्षकांचा उत्साह यांच्या साथीने शेंडा पार्क येथील खुल्या मैदानात डर्ट ट्रॅक स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातील ७० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत पिंकेश ठक्कर, युवराज कोंडेदेशमुख बेस्ट रायडर ठरले.
फेडरेशन आॅफ मोटार स्पोर्टस क्लब्ज आॅफ इंडिया अधिकृत मोटार रेसिंग संघटनेशी संलग्न कोल्हापूर मोटार स्पोर्टसने या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये देशीसह विदेशी गाड्यांचा व त्यावरील मोटारसायकलपटूंचा थरार प्रेक्षकांना अनुभवता आला. ही स्पर्धा रेसिंग चाहत्यांसाठी पर्वणीच ठरली. आबालवृद्धांनी स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी केली होती. स्पर्धा एकूण १३ गटांत घेतली. निकाल पुढीलप्रमाणे : परदेशी खुला गट- युवराज कोंडेदेशमुख, सुनील मोहिते (पुणे), इक्शान शानभाग (सातारा), रॉयल इन्फिल्ड ३५० गट- हितेश घाटगे, आशितोष शिवलकर (पुणे), ओंकार बुधले (कोल्हापूर). नोव्हीस गट- शिवम कांबळे, विश्वविजय कांबळे (कोल्हापूर), कुणाल जोगवाडे (पुणे). स्कूटर गट- पिंकेश ठक्कर (पुणे), अनिकेत कुमकेकर (सांगली), नीरज वांजळे. रॉयल इन्फिल्ड ५०० सीसी. गट- सोहल अहमद (बंगलोर), सचिन घोरपडे, स्वागत खांडेकर (कोल्हापूर). रॉयल इन्फिल्ड हिमालयीन गट- सोहल अहमद (बंगलोर), प्रियंश के. समीर शेख. महाराष्ट्र गट- पिंकेश ठक्कर, विश्वविजय कांबळे, कुणाल जोगवाडे. बॅरल एक्झॉस्ट गट- सोहल अहमद, सचिन घोरपडे, प्रियेश. टू स्ट्रोक ओपन- सोहेल अहमद, पिंकेश ठक्कर, सुनील मोहिते, किड्स ओपन - युवराज कोंडेदेशमुख (पुणे), इक्शान शानभाग (सातारा), जिनेंद्र सांगवे (अब्दुललाट). फोर स्ट्रोक खुला गट- सोहेल अहमद, पिंकेश ठक्कर, सचिन घोरपडे. आर. ई. खुला गट- सोहेल अहमद, ओंकार बुधले, प्रियंश. एक्सपर्ट गट - पिंकेश ठक्कर, स्वागत खांडेकर, सुनील मोहिते यांचा समावेश आहे.
यावेळी पुणे मोटार स्पोर्टसचे विक्रांत राऊत, अन्वर शेख, रचना नंदा, रॉयल रायडर्सचे जयदीप पवार, अभिजित काशीद, बॅरल एक्झॉस्टचे ओंकार बुधले, ‘अ‍ॅस्टर आधार’चे चिन्मय ठक्कर, आदी उपस्थित होते.
‘बेस्ट रायडर’ म्हणून युवराज कोंडेदेशमुख (परदेशी बनावटी गट), पिंकेश ठक्कर (इंडियन एक्स्पर्ट गट) यांचा गौरव करण्यात आला. यात कोल्हापुरातील अब्दुललाटचा छोटा रायडर जुनेंद्र सांगावे व इक्शान शानभाग (सातारा) यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Web Title: Pinkesh Thakker, Kondesameshukh 'Best Rider'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.