कांडगाव-जैताळ रस्त्यावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:24 AM2021-03-16T04:24:19+5:302021-03-16T04:24:19+5:30

: कांडगाव : जैताळदरम्यानच्या रोडची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना या रोडवरून प्रवास करणे अंत्यत धोकादायक बनले ...

Pits on the Kandgaon-Jaital road | कांडगाव-जैताळ रस्त्यावर खड्डेच खड्डे

कांडगाव-जैताळ रस्त्यावर खड्डेच खड्डे

Next

: कांडगाव : जैताळदरम्यानच्या रोडची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना या रोडवरून प्रवास करणे अंत्यत धोकादायक बनले असून, या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. गेल्या चौदा वर्षांपासून या रोडवर डांबरच न पडल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.

जैताळ, ता.करवीर हे गाव डोंगरावर वसलेले असून, विधानसभा निवडणुकीत करवीरमध्ये, तर जिल्हा परिषद व पंचायत समितीला पश्चिम मतदारसंघात विभागले आहे. कांडगाव ते जैताळदरम्यानचा हा रस्ता दोन किलोमीटरचा असून, तो जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे आहे. या रस्त्यावरून कागल, शिरगाव, गोकुळचे हजारो कामगार ये-जा करतात. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने त्यांनाही रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

कोट : गेल्या चौदा वर्षांपासून या रस्त्यावर डांबरच न पडल्याने रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करा, अन्यथा आंदोलन करणार. बाजीराव कांबळे,

ग्रामस्थ, जैताळ

Web Title: Pits on the Kandgaon-Jaital road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.