साखर उद्योग संपला तर त्यास पीयूष गोयल जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:23 AM2020-12-29T04:23:42+5:302020-12-29T04:23:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस साखर कारखानदारी मोडीत निघाली आहे. याबाबत केंद्रीय वाणिज्य ...

Piyush Goyal is responsible for the demise of the sugar industry | साखर उद्योग संपला तर त्यास पीयूष गोयल जबाबदार

साखर उद्योग संपला तर त्यास पीयूष गोयल जबाबदार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस साखर कारखानदारी मोडीत निघाली आहे. याबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना लक्ष घालण्याची विनंती केली. मात्र, ते व्यापारी असल्याने दुर्लक्ष करत आहेत. महाराष्ट्रातील साखर उद्योग संपला तर त्यास मंत्री गोयल जबाबदार असतील, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी दिला.

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या ‘ई-लॉबी’ भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, साखरेचे दर प्रतिक्विंटल ३१०० रुपये आणि उसाची एफआरपी याचा ताळमेळ बसत नाही. टनामागे ४०० ते ५०० रुपये कमी पडत असल्याने हा उद्योग अडचणीत आला आहे. पुढील हंगामात उसाचे आणखी पीक वाढणार आहे. मात्र, साखर कारखाने बंद पडण्याचा धोका आहे. कारखान्यांचे कंबरडे मोडल्यानंतर निर्यातीचा निर्णय घेतला.

म्हणून ‘पी. एन.’ यांचा राजीनामा

केंद्र सरकारच्या धोरणामुळे साखर उद्योग परवडत नाही. त्यामुळेच पी. एन. पाटील यांनी ‘भोगावती’च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचा गाैप्यस्फोट मंत्री मुश्रीफ यांनी केला.

उपपंतप्रधान पदासाठी मुश्रीफांना शुभेच्छा

जिल्हा बँकेच्या जुन्या इमारतीचे भूमिपूजन यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. भूमिपूजनानंतर ते थेट देशाचे उपपंतप्रधान झाले. आता या इमारतीचे भूमिपूजन हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले, तेही उपपंतप्रधान व्हावेत, अशा शुभेच्छा पी. एन. पाटील यांनी दिल्या. यावर मुश्रीफ यांनी त्यांचे आभार मानले.

Web Title: Piyush Goyal is responsible for the demise of the sugar industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.