पाचवी शिष्यृत्तीत पीयूष पाटील, सिद्धेश आंबेकर राज्यात दुसरे, कोल्हापूर जिल्ह्यातील १९ टक्के विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 03:38 PM2024-07-03T15:38:19+5:302024-07-03T15:38:39+5:30
भुदरगड, राधानगरी, कागल तालुके अव्वल, राज्य यादीत १९ टक्के विद्यार्थी जिल्ह्यातील
कोल्हापूर : पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. जिल्ह्यात या परीक्षांमध्ये भुदरगड, राधानगरी आणि कागल तालुक्याने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तर राज्य गुणवत्ता यादीमध्ये १९ टक्के विद्यार्थी हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. पाचवी परीक्षेत वि.मं. खामकरवाडीचा विद्यार्थी पीयूष संभाजी पाटील आणि सेंट्रल स्कूल तारळेचा सिद्धेश शैलेश आंबेकर या दोघांनी ९६.६४४३ टक्के गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने १८ फेब्रुवारी २०२४ रोजी या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल मंगळवारी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला. पाचवी शिष्यवृत्तीमध्ये ग्रामीणमध्ये राज्य गुणवत्ता यादीत राज्यातील १२१ जणांचा समावेश असून त्यामध्ये २८ विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. पाचवी शिष्यवृत्ती शहरीमध्ये राज्य गुणवत्ता यादीत ११३ विद्यार्थी असून त्यातील १६ विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. आठवी ग्रामीण राज्य गुणवत्ता यादीत राज्यातील १०२ तर जिल्ह्यातील २६ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. आठवी शहरी राज्य गुणवत्ता यादीत १०२ विद्यार्थी असून यामध्ये १३ विद्यार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.
अशा पद्धतीने राज्य गुणवत्ता यादीतील ४३८ विद्यार्थ्यांपैकी ८३ म्हणजे १९ टक्के विद्यार्थी एका कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. पाचवी शिष्यवृत्ती निकालाची राज्याची टक्केवारी २४.११ असून कोल्हापूर जिल्ह्याची टक्केवारी ३८.९६ इतकी आहे. तर आठवीची राज्याची टक्केवारी १५.२३ असून जिल्ह्याची टक्केवारी २६.७१ टक्के इतकी आहे. या यशाबद्दल कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांचे अभिनंदन केले आहे.
पाचवी शिष्यवृत्तीतील जिल्ह्यातील पहिले ११ विद्यार्थी
अ.न. - शाळा - विद्यार्थी - गुण टक्के
२ - वि.मं. खामकरवाडी - पीयूष संभाजी पाटील - ९६.६४४३
२ - सेंट्रल स्कूल तारळे खुर्द - सिद्धेश शैलेश आंबेकर - ९६.६४४३
५ - प. बा. पाटील हायस्कूल मुदाळ - शिवम सचिन कुदळे - ९५.३०२०
५ - वि.मं. सोनाळी वरद - धनाजी पाटील - ९५.३०२०
५ - वि. मं. म्हाकवे - आराध्या उत्तम पाटील - ९५.३०२०
६ - वि.मं.साेनाळी - स्वरांजली रमेश करवळ - ९४.६३०९
६ - वि.मं. नांदोळी - स्वरा चंद्रकांत पाटील - ९४.६३.०९
८ - कन्या वि.मं. उत्तूर - चिन्मयी सचिन थोरवत - ९३.९५९७
८ - वि.मं. म्हाकवे - आराध्या संजय पाटील - ९३.९५९७
११ - वि.मं. गुडेवाडी - स्वरूप इंद्रजित टोणपे - ९२.६१७४
११ - वि. मं. म्हाकवे - ज्ञानेश्वरी पांडुरंग पाटील - ९२.६१७४
आठवी शिष्यवृत्तीतील जिल्ह्यातील पहिले १२ विद्यार्थी
अ.न. - शाळा - विद्यार्थी - गुण टक्के
६ - प. बा. पाटील विद्यालय मुदाळ - अथर्व देवानंद हसबे - ९१.३३३३
६ - प. बा. पाटील विद्यालय मुदाळ - रोहित महेश पाटील - ९१.३३३३
६ - पार्वती शंकर विद्यालय उत्तूर - अनुष्का सुनील पोटे - ९१.३३३३
९ - काडसिद्धेश्वर हायस्कूल कणेरी - श्रेया तात्यासोा माळी - ९०.००००
९ - प. बा. पाटील विद्यालय - राजवर्धन साताप्पा पाटील - ९०.००००
९ - पळशिवणे विद्यालय - स्मिता सुहास रेडेकर - ९०.००००
११ - छ. शिवाजी हायस्कूल महागाव - आयुष्या सटुप्पा फडके - ८९.३३३३
१३ - प. बा. पाटील विद्यालय मुदाळ - धीरज राजेंद्र देसाई - ८८.६६६७
१३ - प. बा. पाटील विद्यालय मुदाळ - सौम्या सागर तोंदले - ८८.६६६७
१५ - एसव्हीपीएम विद्यालय सोळांकूर - वैष्णवी नितीन निचिते - ८८.००००
१५ - मोहनलाल दोशी विद्यालय अर्जुननगर - अंकिता कृष्णा सुतार - ८८.००००
१७ - नागेश्वर हायस्कूल राशिवडे - आरुषी सुहास पाटील - ८७.३३३३