कोल्हापूर शहर प्रवेशद्वाराची जागा ताब्यात घेऊन सुशोभीकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:27 AM2021-08-24T04:27:48+5:302021-08-24T04:27:48+5:30
कोल्हापूर : शहराच्या प्रवेशद्वारची कमान ही कोल्हापूरची अस्मिता आहे. प्रवेशद्वाराची जागा ताब्यात घेऊन तातडीने त्याचे सुशोभीकरण व नामकरण करावे, ...
कोल्हापूर : शहराच्या प्रवेशद्वारची कमान ही कोल्हापूरची अस्मिता आहे. प्रवेशद्वाराची जागा ताब्यात घेऊन तातडीने त्याचे सुशोभीकरण व नामकरण करावे, अशा सूचना सोमवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनास लेखी पत्राद्वारे केल्या.
शहराचे प्रवेशद्वार गेली कित्येक वर्षे समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. शिवसेनेने प्रवेशद्वारावर रयतेचे राजे “राजर्षी छत्रपती शाहू महाराज” यांच्या नावाचा फलक फडकविला होता. प्रवेशद्वाराचे विद्रुपीकरण करू नये, अशा सूचनाही कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनास दिल्या होत्या.
प्रवेशद्वारात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे, गवत, रस्त्याला पडलेल्या भेगा, सिमेंट रस्ता खुदाई करून तेथे केलेल्या डांबरीकरणामुळे पडलेले खड्डे, अतिक्रमण, महामार्गामुळे होणारी वाहतुकीची कोंडी, प्रवेशद्वार परिसरात न होणारी स्वच्छता आदी बाबी नित्याच्याच बनल्या. प्रवेशद्वार (तावडे हॉटेल कमान)ची जागा तत्काळ महानगरपालिकेच्या ताब्यात घेऊन प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करून यास “राजर्षी छत्रपती शाहू महाराज” असे नामकरण करावे, करवीरनगरीमध्ये सहर्ष स्वागत अशा आशयाचा फलक लावावा, अशा सूचना क्षीरसागर यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिल्या.