इचलकरंजीत बेंदूर सणानिमित्त आठवणी झाल्या जाग्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:25+5:302021-06-26T04:17:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : इचलकरंजी शहर आणि कर्नाटकी बेंदूर सणाचे नाते काही औरच आहे. येथील बेंदूर सणाचे सर्वांनाच ...

Places commemorated on the occasion of Bendur festival in Ichalkaranji | इचलकरंजीत बेंदूर सणानिमित्त आठवणी झाल्या जाग्या

इचलकरंजीत बेंदूर सणानिमित्त आठवणी झाल्या जाग्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : इचलकरंजी शहर आणि कर्नाटकी बेंदूर सणाचे नाते काही औरच आहे. येथील बेंदूर सणाचे सर्वांनाच आकर्षण असून, याची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. अनेक वर्षांपासून जनावरांच्या शर्यतीवरील बंदीमुळे लाकूड ओढण्याच्या शर्यत प्रकारात खंड पडला. मात्र, शुक्रवारी बेंदूर सणानिमित्त शहर व परिसरामध्ये पुन्हा आठवणी जाग्या झाल्या. शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम व अटीवर सण साजरा करण्यात आला.

इचलकरंजीचे संस्थानिक श्रीमंत नारायणराव घोरपडे यांनी सन १९०५ मध्ये सुरू केलेल्या कर्नाटकी बेंदूर सणाला ११६ वर्षांपासूनची परंपरा आहे. बैलांप्रती आदरभाव व्यक्त करणारा हा सण इचलकरंजी हे औद्योगिक शहर असूनदेखील आजही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. कर्नाटकी बेंदूर शहरवासीयांना आनंदाची पर्वणी देणारा आहे. त्यामुळे कर्नाटकी बेंदूर सणाला शहरात गेल्या अनेक वर्षांपासून अनन्यसाधारण महत्त्व आहे.

शहरात लाकूड ओढण्याची शर्यत चांगलीच लोकप्रिय आहे. ही शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शौकीन येत असतात. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लाकूड ओढण्याच्या शर्यतीला गेल्या काही वर्षांपासून बंदी घालण्यात आली आहे. सध्या शहरातील गावभागातील महादेव मंदिरजवळ कर तोडणी व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. परंतु, कोरोना महामारीमुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह शर्यतप्रेमी व युवकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

चौकटी

कोरोनामुळे प्रातिनिधिक स्वरुपात सण साजरा

तब्बल ११६ वर्षांची परंपरा असलेला शहरातील बेंदूर सण कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी प्रातिनिधिक स्वरुपात साजरा केला. इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळातर्फे सर्व कार्यक्रम रद्द करून नियमांचे पालन करीत शिवेंद्र पाटील यांच्या मानाच्या बैलांचे जि. प. सदस्य राहुल आवाडे, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार व अंबाबाई मंदिरातील सेविका अश्विनी पोतदार, सुशिला पोतदार यांनी पूजन केले. याप्रसंगी अध्यक्ष बाळासाहेब कलागते, नंदू पाटील, अहमद मुजावर, राजेंद्र बचाटे, किशोर पाटील, आदी उपस्थित होते.

सोशल मीडियावर स्टेट्स व संदेश

अनेक वर्षांपासून सुरू असणारा बेंदूर सण यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्यामुळे सर्वांचा हिरमोड झाला. मात्र, दिवसभर सोशल मीडियावर मागील वर्षातील शर्यतीचे व बेंदूर सणाचे स्टेट्स व संदेश व्हायरल होत होते.

फोटो ओळी

२५०६२०२१-आयसीएच-०२

इचलकरंजीत बेंदूर सणानिमित्त शिवेंद्र पाटील यांच्या मानाच्या बैलांचे पूजन जि. प. सदस्य राहुल आवाडे व पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केले.

२५०६२०२१-आयसीएच-०३

इंगळी (ता. हातकणंगले) येथील बेंदूर सणानिमित्त बैलांना सजवून वाद्यांसह गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चौगुले शेतकरी कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा केली.

(छाया : उत्तम पाटील)

Web Title: Places commemorated on the occasion of Bendur festival in Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.