आढावा घेऊन पाणी अडविण्याचे नियोजन करा : सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 02:21 PM2017-08-16T14:21:02+5:302017-08-16T14:24:02+5:30
कोल्हापूर : जिल्'ातील पाणी स्थिती पाहून कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयांमध्ये पाणी अडविण्यासाठी बरगे टाकावेत अशा सूचना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिल्या.
कोल्हापूर : जिल्'ातील पाणी स्थिती पाहून कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयांमध्ये पाणी अडविण्यासाठी बरगे टाकावेत अशा सूचना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिल्या.
कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयांचे गेट बंद करुन चालू वर्र्षीच्या पावसाळ्यामध्ये १०० टक्के पाणीसाठी करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे शासनाचे निर्देश असून त्यादृष्टीने प्रत्येक जिल्'ात आढावा बैठक घेण्यात येत आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्'ाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कायर्कारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनिल साळुंखे, कायर्कारी अभियंता किरण पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, प्र. कायर्कारी अभियंता (यांत्रिकी) संग्राम पाटील आदी उपस्थित होेते.
मंत्री खोत म्हणाले, कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यासाठी दरवाजे बसविण्याबाबतची नवीन कार्यप्रणाली शासनाने निर्गमित केलेली आहे. राज्यात सध्या १०३१ कोल्हापूर पध्दतीचे बंधारे असून त्यांची पाणी वापर क्षमता ५५ टीएमसी आहे. तर जिल्'ात ३४३ कोल्हापूर पध्दतीचे बंधारे असून २९३ बंधारे पूर्ण आहेत. त्यातून १७५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठी आहे.
बहुतांशी बंधारे ३० ते ४० वर्षापूर्वी बांधलेले असून बंधाºयांची व बरग्यांची मोठया प्रमाणावर नादुरुस्ती झालेली आहे. त्यामुळे अपेक्षित पाणीसाठयावर व सिंचनावर विपरीत परिणाम होत असून त्यांना बरगे घालणे काढणे व दुरुस्ती यांचे नियोजन पावसाळ्यामध्ये होणारा पाणीसाठा व जिल्'ातील पावसाची स्थिती व पावसाचा अंदाज घेवून नियोजन करा.