विमान स्वस्तात... रस्ता महागात !

By admin | Published: May 1, 2017 12:00 AM2017-05-01T00:00:23+5:302017-05-01T00:00:23+5:30

अडीच हजारांत हवाई प्रवास : पुणे किंवा कोल्हापूर विमानतळ सातारकरांसाठी पर्याय; जाण्या-येण्याचा खर्च महागडा

The plane is cheap ... the road is expensive! | विमान स्वस्तात... रस्ता महागात !

विमान स्वस्तात... रस्ता महागात !

Next



सातारा : हवाई चप्पल घालणाऱ्यालाही हवाई सफर घडावी, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच ‘उडान’ योजनेचा प्रारंभ केला. ही योजना सातार जिल्हावासीयांसाठी मात्र चार आण्याचं तिकीट अन् बारा आण्याचं भाडं! अशा स्थितीत आहे. पुणे किंवा कोल्हापूरला विमानतळावर गेल्याशिवाय सातारकरांना विमान मिळणार नाही; पण तिथंपर्यंत जायला विमान तिकिटाच्या किमती एवढेच गाडी भाडे द्यावे लागणार आहे.
प्रादेशिक हवाई संपर्क योजनेद्वारे भारतात सामान्य माणसाचे स्वस्त हवाई सफरीचे स्वप्न पूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प आहे. त्यानुसार स्वस्त हवाई सफरचा प्रवासाचा प्रारंभ करण्यात आला. देशातील ४५ विमानतळांवर टप्प्याटप्प्याने स्वस्त प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि कोल्हापूर विमानळावर ही सोय सप्टेंबर २०१७ पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सातारा जिल्ह्यात विमानतळ नसल्यामुळे सातारा, महाबळेश्वर, खटाव, वाई, खंडाळा, फलटण, कोरेगाव या सात तालुक्यांना पुणे विमानतळ जवळ आहे. तर कऱ्हाड आणि पाटण तालुक्यांसाठी कोल्हापूरचे विमानतळ जवळ आहे. या तालुक्यांच्या ठिकाणाहून विमानतळापर्यंत चारजणांचा एक वेळचा जाण्याचा खर्च कमीत कमी ३ हजार रुपये आहे. त्यामुळे सातारकरांसाठी हा प्रवास थोडा खर्चिकच असणार आहे. (प्रतिनिधी)
प्रवास भाडे विमान तिकिटाच्या दुप्पट
कोल्हापूर आणि पुणे या दोन्ही ठिकाणची विमानतळे शहरापासून खूप अंतरावर असल्याने खासगी गाडी केली तर त्याचा प्रवास खर्च वाढतो. त्यामुळे अनेकदा खासगी गाडीमालक हे प्रवासभाडे किलोमीटरवर न नेता संयुक्तिक घेतात. सातारा ते पुणे चार सिटर गाडीसाठी टोल, ड्रायव्हरसह अडीच हजार रुपये घेतात. चारजण असतील तर हा प्रत्येकी साडेसहाशे रुपये खर्च येतो; पण एकटाच कोणी जाणार असेल तर हा प्रवास परवडत नाही. विमानतळावर गाडी सोडायला आणि न्यायला येते, त्याचे वेगवेगळे दर आकारते. त्यामुळे एका प्रवासासाठी दोनदा खासगी गाडी करावी लागते. त्यामुळे खर्च वाढतो. विमान प्रवासाच्या दुप्पट हा खर्च होत असल्याचे दिसते.
कऱ्हाड बसस्थानक ते विमानतळ अंतर : १२ कि़मी.
एसटी तिकिट : १४ "
खासगी वाहन भाडे : १०० "

Web Title: The plane is cheap ... the road is expensive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.