शिवजयंती निमित्त पोलिस बंदोबस्ताचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:06 AM2021-02-20T05:06:37+5:302021-02-20T05:06:37+5:30
कोल्हापूर : शिवजयंतीनिमित्त शहरासह जिल्ह्यात २२०० पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सहाशेहून अधिक गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले असल्याची ...
कोल्हापूर : शिवजयंतीनिमित्त शहरासह जिल्ह्यात २२०० पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सहाशेहून अधिक गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गुरुवारी दिली.
शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी दिवसभरात विविध मंडळे, तालीम, संस्थांना भेट दिली. या भेटीत या अधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रार्दुभाव अजूनही संपलेला नाही. त्यामुळे मंडळांनी मिरवणुका काढू नयेत. अशी सूचनावजा विनंती केली. मिरवणुका काढतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कोरोनाचा कहर अजूनही सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी शिवजयंती साधेपणाने साजरी करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. दरम्यान सायंकाळी किल्ले पन्हाळगडावर जाणाऱ्या कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील पंचगंगा नदी पुलानजीक नाकाबंदीचे आदेशही त्यांनी दिले. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.