( नियोजनातील विषय)....लाखमोलाच्या घरासाठी अवघ्या पन्नासाचे कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:13 AM2020-12-28T04:13:33+5:302020-12-28T04:13:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, सचिन भोसले - कोल्हापूर : आयुष्यात घर, चारचाकी घेणे हे सर्वसामान्यांचे स्वप्न असते. त्यात आयुष्याची पुंजी ...

(Planning subject) .... Only fifty locks for a house worth lakhs | ( नियोजनातील विषय)....लाखमोलाच्या घरासाठी अवघ्या पन्नासाचे कुलूप

( नियोजनातील विषय)....लाखमोलाच्या घरासाठी अवघ्या पन्नासाचे कुलूप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क,

सचिन भोसले - कोल्हापूर : आयुष्यात घर, चारचाकी घेणे हे सर्वसामान्यांचे स्वप्न असते. त्यात आयुष्याची पुंजी लावून व लाखो रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा करून स्वत:चे घर बांधतात. मात्र, त्या घराच्या सुरक्षेसाठी ना विम्याचे संरक्षण घेतले जात नाही. तसेच दणकट कुलूप खरेदी करताना काटकसर केली जाते. त्यात घराची सुरक्षेला गौण स्थान दिले जाते. केवळ बंद घराचे कुलपे दणकट नसल्यामुळे घरात असलेले स्त्रीधन अर्थात लाखमोलाचे सोन्याचे दागिने, मौल्यवान वस्तू, किमती ऐवज चोरटे चोरून नेत आहेत. विशेष म्हणजे कोल्हापुरात स्वस्तातील पॅड लॉकला अधिक मागणी आहे. त्याखालोखाल स्वस्तातील शटर लॉकलाही मागणी आहे. मात्र, याचे प्रमाण अल्प आहे.

लॉकडाऊन काळात अनेकांना कोरोनाची लागण झाली. त्यात अख्खी कुटुंबच अलगीकरण क्वारंटाईन झाली होती. त्यामुळे त्यांच्या घरांना कुलुपे होती. अशा आणीबाणीच्या काळातही चोरट्यांनी याही संधीचा लाभ घेत किमती ऐवजावर डल्ला मारला. यात श्रीमंतांसह गरिबांनाही मानसिक, आर्थिक फटका बसला. त्यात अनेकांच्या आयुष्याची पुंजीही चोरट्यांनी पळविली. घरांच्या कडीकोयंड्यांना चांगल्या दर्जाची, दणकट कुलुपे नव्हती. त्यामुळे चोरट्यांनी कटावणी, कटरने ही कुलुपे तोडल्याची अनेक उदाहरणे पुढे आली आहेत. या चोऱ्यांमुळे नागरिकांसोबत पोलिसांनाही अधिकचे काम लागले.

कोल्हापुरात कुलूप विक्रीच्या दुकानांमध्ये अनेक जण कुलूप खरेदी करताना त्याला दर्जा, वॉरंटी आदीचा विचार न करता खरेदी करतात. यात पॅड लॉकच्या ४०, ५०, ९०, १५०, २००, ३५०, ४५० अशा कुलुपांना मागणी आहे. त्याखालोखाल पूर्णपणे लोखंडी रिंग असलेले व दुकानांकरिता सर्वाधिक सुरक्षित समजले जाणाऱ्या शटर (लॉक) कुलुपाला मागणी आहे. या कुलुपांची किंमत २०० रुपयांपासून ४,५०० रुपयांपर्यंत आहे. याशिवाय जादा किमतीच्या अशा कुलुपांना पंधरा वर्षांची वॉरंटीही आहे. ही कुलुपे कटावणी, कटरने अजिबात निघत नाहीत अथवा तुटत नाहीत. या कुलुपांना किल्ली बनविणारे जाग्यावर नेऊन बनावट चावी करण्याशिवाय पर्याय राहात नाही. त्या खालोखाल मोर्डीज लॉकला मागणी आहे. हे कुलूप नाईट लॅच म्हणूनही ओळखले जाते. यालाही फ्लॅट, बंगलेधारकांकडून मागणी आहे. अनेकदा हे लॉक वाऱ्याच्या झोक्यानेही बंद होत असल्याने मनस्तापाला कारणीभूत ठरते. डेडबोल्ट लॉकच हे फ्लॅटसाठी सुरक्षित मानले जाते. त्यामुळे ज्यांना मालमत्ता व घरातील किमती ऐवजाची काळजी आहे. असे लोक डेडबोल्ट लॉक अर्थात लॅचचीच मागणी करतात. ठराविक चिकित्सक लोक ५ ते दहा हजारांच्या शटर लॉक, अलार्म लॉकचाच घराच्या सुरक्षेसाठी वापरतात. या लॉकमध्ये एखाद्या चोरट्याने या कुलुपाशी छेडछाड केली तर घरमालकाला त्याचा संदेश त्याच्या मोबाईल क्रमांकवर येत असल्याने चोरट्यांची खबर पोलीस व शेजारीपाजऱ्यांना देता येते. त्यामुळे अशा अत्याधुनिक कुलूप खरेदीकडेही कल वाढला आहे.

अनेकदा बंद घरे, दुकाने चोरट्यांनी फोडल्यानंतरही पूर्वी होते त्यासारखेच कुलूप खरेदी करण्याकडे या लोकांचा कल असतो. विशेष म्हणजे पॅड लॉकलाच अधिक पसंती देतात. त्यामुळे अशा साध्या कुलुपाला मागणी आहे.

या कुलुपांना मागणी अधिक

पॅड लॉक - ५२ टक्के (सर्वांत स्वस्त कुलूप) - ४० रुपये

कॅप लॉक्स - ०५ टक्के

शटर लॉक - १५ टक्के ( दणकट आणि महाग कुलूप) - ७,५००

मोर्डीज लॉक - ७.५ टक्के

डेडबोल्ट लॉक - ७.५ टक्के

अलार्म लॉक - १३ टक्के (सर्वाधिक महागडे कुलूप) - सुमारे १५ हजार

वर्षभरात झालेल्या घरफोड्या

जानेवारी ते नोव्हेंबर २०२० मध्ये एकूण २६८ घरफोड्या झाल्या. यात जानेवारी - ३०, फेब्रुवारी - ३६, मार्च - १७, एप्रिल - २३, मे - १३, जून - १७, जुलै -१३, ऑगस्ट - २३, सप्टेंबर - २०, ऑक्टोबर - ३१ आणि नोव्हेंबर - ४५ अशा २६८ चोऱ्यांचा वर्षभरात समावेश आहे.

Web Title: (Planning subject) .... Only fifty locks for a house worth lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.