नियोजनातील विषय : शंभर टक्के हागणदारीमुक्त जिल्ह्यात सार्वजनिक शौचालयांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:48 AM2020-12-17T04:48:47+5:302020-12-17T04:48:47+5:30

कोल्हापूर : ‘स्वच्छ भारत मिशन’मध्ये शंभर टक्के हागणदारी मुक्तीचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातून ‘हागणदारी’ हा ...

Planning topics: The plight of public toilets in a hundred percent garbage free district | नियोजनातील विषय : शंभर टक्के हागणदारीमुक्त जिल्ह्यात सार्वजनिक शौचालयांची दुर्दशा

नियोजनातील विषय : शंभर टक्के हागणदारीमुक्त जिल्ह्यात सार्वजनिक शौचालयांची दुर्दशा

Next

कोल्हापूर : ‘स्वच्छ भारत मिशन’मध्ये शंभर टक्के हागणदारी मुक्तीचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातून ‘हागणदारी’ हा शब्दच हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. वैयक्तिक शौचालयांची संख्या वाढली ही समाधानकारक बाब असली तरी सार्वजनिक शौचालयांची मात्र देखभालीअभावी दुर्दशा होत आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांची कुचंबणा होत आहे. त्यातून पुन्हा एकदा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न डोके वर काढू लागला आहे.

जिल्ह्यात गाव, वाड्या-वस्त्या मिळून ११९७ इतकी संख्या भरते. जिल्हा परिषदेने २००७ पासून सातत्याने जोर लावून ‘हागणदारीमुक्त जिल्हा’ हाेण्याच्या दृष्टीने धोरणे राबविली. २०१४ मध्ये त्याला फळ आले आणि जिल्हा शंभर टक्के हागणदारीमुक्त झाला. राष्ट्रपतींच्या हस्ते पहिल्या क्रमांकाचे बक्षीसही जिल्ह्याने घेतले. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने एवढ्यावरच न थांबता वैयक्तिक शाैचालये बांधण्याचा धडाकाच सुरू केला. आजच्या घडीला वाढीव लोकसंख्येतील ३८८९ व सार्वजनिक शौचालयांचा वापर करणारी ३८८९ अशी एकूण ७ हजार ८४५ कुटुंबे वगळली तर जिल्ह्यातील ५ लाख २५ हजार ३३६ लाख कुटुंबांकडे वैयक्तिक शाैचालये आहेत. त्याचा वापरही चांगल्या प्रकारे होत आहे.

पण याचवेळी सार्वजनिक शौचालयांकडे मात्र संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अलीकडे शहराच्या ठिकाणी सुलभ शौचालये आल्याने बाहेरून येणाऱ्यांची काही प्रमाणात सोय होते, पण मोफत सेवा पुरवणारी सार्वजनिक शौचालये मात्र घाणीने माखली असल्याने असण्यापेक्षा नसलेलीच बरी, असे म्हणण्याची वेळ येते तरीही ग्रामीण भागात याच शाैचालयांचा वापर ३८०० कुटुंबांकडून होत आहे. स्वच्छतेअभावी आरोग्याचे प्रश्न डोके वर काढत आहेत.

चौकट०१

ग्रामविकास मंत्री, पालकमंत्र्यांचे तालुकेच मागे

जिल्ह्यात ३० हजार ९५ इतकी वाढीव कुटुंबे वाढली आहेत. त्यापैकी शौचालय नसलेल्यांची जिल्ह्यातील संख्या ७८४५ इतकी आहे. त्यात करवीर, कागल, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड या जिल्ह्यांतील बड्या नेत्यांचे आणि सधन तालुके आघाडीवर आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे तालुकेच शाैचालय नसलेल्या यादीत पहिल्या दोन क्रमांकांवर आहेत.

चौकट ०२

वैयक्तिक शौचालय नसलेली कुटुंबसंख्या

करवीर ९३८, कागल ५५६, पन्हाळा ५५१, राधानगरी ५२८, भुदरगड ३८२, शाहूवाडी २७३, आजरा २४२, गगनबावडा १४५, हातकणंगले ११९, चंदगड ८५, गडहिंग्लज ५२, शिरोळ ०६

चौकट ०३

अजून बांधकाम शिल्लक असलेली शाैचालये : ७८४५

चौकट ०४

शौचालय असलेली कुटुंबे : ५ लाख २५ हजार ३३६

शौचालये नसलेली कुटुंबे : ७८४५

प्रतिक्रिया

जिल्हा हागणदारीमुक्त झाला असल्याने घनकचरा अभियान आता हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत घनकचरा व सांडपाण्यावर अधिक भर दिला असून त्यातही जिल्हा चांगले काम करत आहे.

प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग

Web Title: Planning topics: The plight of public toilets in a hundred percent garbage free district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.