मनपाडळे जुगाई मंदिर परिसरात ५५५५ रोपांचे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:10+5:302021-07-03T04:17:10+5:30
नवे पारगाव : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायत व सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत गायरानात जुगाईदेवी मंदिर परिसरात ...
नवे पारगाव : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथे ग्रामपंचायत व सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत गायरानात जुगाईदेवी मंदिर परिसरात ऑक्सिजन पार्क करणार असल्याची माहिती सरपंच रायबाराजे शिंदे व उपसरपंच उल्हास वाघमारे यांनी दिली.
निसर्गाच्या ऋणाची काही प्रमाणात परतफेड व्हावी यासाठी या वर्षी ५५५५ झाडे लावून ती झाडे जगवण्याचा संकल्प केला असल्याचे उपसरपंच उल्हास वाघमारे यांनी सांगितले.
जुगाई मंदिर परिसरात आंबा, वड, पिंपळ, लिंब, करंजी फळ बियांची ५५00 रोपे लावली. ग्रामपंचायत सदस्य शिल्पा पाटील, अरुणा वाघमारे, शंकर सूर्यवंशी, अनिल घोडके, संजय पाटील व विविध संस्थाचे पदाधिकारी व मंडळाचे कार्यकर्ते विद्यार्थी उपस्थित होते.
०२ मनपाडळे वृक्षारोपण
फोटो ओळी: मनपाडळे (ता. हातकणंगले) येथे वृक्षारोपण करताना सरपंच रायबाराजे शिंदे व उपसरपंच उल्हास वाघमारे. सोबत सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.