लकीकट्टे धरण परिसरात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:28 AM2021-08-28T04:28:13+5:302021-08-28T04:28:13+5:30

कै. सुशांत गजानन राऊत यांच्या सहाव्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी के. के. व्हीयन्स-वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राऊत ...

Plantation in Lakikatte dam area | लकीकट्टे धरण परिसरात वृक्षारोपण

लकीकट्टे धरण परिसरात वृक्षारोपण

Next

कै. सुशांत गजानन राऊत यांच्या सहाव्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी के. के. व्हीयन्स-वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राऊत म्हणाले, प्रत्येकाने वर्षातून एक झाड लावून जगवले तर आपल्या देशाच्या पर्यावरण रक्षणात फार मोठा बदल घडून येईल. यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा. सरपंच अरुण पाटील म्हणाले, जगभर बिघडत चाललेले पर्यावरण रोखण्यासाठी वृक्षारोपण हा महत्त्वाचा उपक्रम आहे. वृक्षलागवड ही एक चळवळ बनण्याची गरज आहे.

यावेळी उपसरपंच आप्पाजी पाटील, तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष दयानंद पाटील, निवृत्त वन निरीक्षक एन. आर. पाटील, ग्रामसेवक साखरे, पंकज पाटील यांच्यासह तरुण उपस्थित होते.

फोटो ओळी : लक्कीकट्टे (ता. चंदगड) येथील धरण क्षेत्र परिसरात वृक्षलागवड करताना प्रकाश राऊत, सरपंच अरुण पाटील, उपसरपंच पाटील आदी उपस्थित होते.

क्रमांक : २७०८२०२१-गड-०१

Web Title: Plantation in Lakikatte dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.