काखेत नवदाम्पत्याकडून वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:25 AM2021-05-21T04:25:02+5:302021-05-21T04:25:02+5:30
वारणानगर : काखे (ता.पन्हाळा) येथील प्रदीप यशवंत सरनाईक व पत्नी पूजा सरनाईक यांनी त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने काखे गावात आ. ...
वारणानगर : काखे (ता.पन्हाळा) येथील प्रदीप यशवंत सरनाईक व पत्नी पूजा सरनाईक यांनी त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने काखे गावात आ. विनयरावजी कोरे उद्योग समूहाचे नेते दीपक पाटील (भाऊ) यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षण राखण्यास मदत केली. सरनाईक नवदाम्पत्यांनी राबवलेल्या उपक्रमांचे कौतुक होत आहे.
येथील जयभवानी तालीम सदस्य अभिजित सातवेकर यांनी एक वाढदिवस एक झाड व नवदापत्याकडून वृक्षारोपण करणे ही संकल्पना गावात गेल्या दोन वर्षांपासून सर्वाच्या मदतीने राबवली जाते.
यावेळी एएसके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी यांनी आतापर्यंत अनेक झाडांचे वृक्षारोपण केले असून येत्या ५ जूनला जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रत्येक व्यक्तीने पाच झाडे लावून त्याचे वर्षभर निगा राखली पाहिजे याची जबाबदारी स्वतः घेणार असल्याचे
सांगून वड, पिंपळ, लिंब, आंबा, चिंच आदी झाडे लावून पर्यावरण राखण्यास मदत करण्याचे आवाहन केले.
सध्या कोरोनाची महामारी मोठी आहे. त्याला रोखण्यासाठी अनेक सुविधा व योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. त्यातील एक उपाय म्हणून ऑक्सिजनला महत्त्व आहे. यासाठी आपले झाड आपली जबाबदारी या संकल्पनेला साद घालून प्रत्येकाने जबाबदारी पार पाडावी असे आवाहन सरनाईक दाम्पत्यांनी केले.
यावेळी रणजित पाटील, अभिजीत सातवेकर, विजयकुमार सातवेकर, यशवंत अकॅडमीचे खेळाडू व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
...............................
..
फोटो ओळी- काखे (ता.पन्हाळा ) प्रदीप सरनाईक व पूजा सरनाईक नवदाम्पत्यांकडून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी एएसके फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी, अभिजीत सातवेकर, इतर पदाधिकारी.
सोबत फोटो-