सातेरी-महादेव डोंगरी भागात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:27 AM2021-09-06T04:27:13+5:302021-09-06T04:27:13+5:30
सातेरी-महादेव तीर्थक्षेत्राच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी हरित टेकडी योजनेतून दोन हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन ही करण्यात ...
सातेरी-महादेव तीर्थक्षेत्राच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी हरित टेकडी योजनेतून दोन हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन ही करण्यात आले होते . उर्वरित जमिनीमध्ये व मुख्य वाहतुकीच्या रस्त्यानजीक झाडे लावण्याचा उपक्रम पार पडला .
या वृक्षलागवड मोहिमेत करवीर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य राजेंद्र सुर्यवंशी ,रयत कृषि संघाचे संचालक कुंडलिक पाटील, बाबूराव जाधव, बाळासाहेब नलवडे, मारुती कंदले, संदीप सुतार, संग्राम भोपळे, ज्ञानदेव जाधव, नामदेव यादव, मधुकर नलवडे, सूरज पाटील, रामदास पौंडकर, विष्णू यादव, महेश संकपाळ उपस्थितीत होते.
सातेरी-महादेव येथील पर्यटन क्षेत्र परिसरात वृक्षचळवळ निसर्गप्रेमी व राजेंद्र सूर्यवंशी युवा मंच यांच्या तर्फ रविवारी वृक्षलागवड उपक्रम राबविण्यात आला. यावेळी राजेंद्र सूर्यवंशी, बाबूराव जाधव, मारुती कंदले, कुंडलिक पाटील, नामदेव यादव,यांच्यासह युवक सहभागी होते.