वीरशैव समाजातर्फे रूद्रभूमीत वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:35+5:302021-06-29T04:17:35+5:30
कोल्हापूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड, संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ...
कोल्हापूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड, संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. वीरशैव लिंगायत समाजातर्फे सिद्धार्थनगर परिसरातील वीरशैव रूद्रभूमी (स्मशानभूमी) येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे अध्यक्षस्थानी होते .
अध्यक्ष गाताडे यांच्या हस्ते मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार झाला. यावेळी ज्येष्ठ संचालक नानासाहेब नष्टे, ॲड. सतीश खोतलांडे, चंद्रकांत हळदे, सुहास भेंडे, राजेश पाटील, अविनाश नाशिपूडे, केतन तवटे, गणेश सन्नकी, बबन गवळी, महांतेश गाडवी, धर्मेद्र नष्टे, राहुल नष्टे, शिवाजीराव माळकर, किरण व्हनगुत्ते, बी. एस. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. राजेश पाटील-चंदूरकर यांनी प्रास्ताविक केले. सचिव राजू वाली यांनी आभार मानले.
फोटो : २८०६२०२१-कोल- वीरशैव रूद्रभूमी
कोल्हापुरातील वीरशैव लिंगायत समाजातर्फे सिद्धार्थनगर परिसरातील वीरशैव रूद्रभूमी (स्मशानभूमी) येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक नानासाहेब नष्टे, ॲड. सतीश खोतलांडे, चंद्रकांत हळदे आदी उपस्थित होते.