पर्यावरण दिनानिमित्त ११०० रोपांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:36+5:302021-06-06T04:18:36+5:30

१९ सप्टेंबर २०२० मध्ये सुरुवात झालेल्या वनराई ग्रुपच्या माध्यमातून ३३ हजार झाडे लावून जगवण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहेत. विजय ...

Planting of 1100 saplings on the occasion of Environment Day | पर्यावरण दिनानिमित्त ११०० रोपांचे रोपण

पर्यावरण दिनानिमित्त ११०० रोपांचे रोपण

Next

१९ सप्टेंबर २०२० मध्ये सुरुवात झालेल्या वनराई ग्रुपच्या माध्यमातून ३३ हजार झाडे लावून जगवण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहेत. विजय दळवी यांनी झाडे जगवण्यासाठी आठवड्यातून एकदा देवराई फाउंडेशनमधील झाडांसाठी लागणारे पाणी मोफत दिले आहे. झाडे लावण्यासाठी येणारा खर्च लोकवर्गणीतून करण्यात येत आहे.

देवराई फाउंडेशनचे अध्यक्ष रघुनाथ ढोले यांच्याकडून मोफत वृक्ष पुरवण्यात येत आहेत. आतापर्यंत ९ एकर जमिनीवर ५१०० हजार खड्यात ३१०० झाडे लावून त्यांचे जतन करण्यात येत आहे.

यावेळी वनराई ग्रुपकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या झाडे लावण्याच्या उपक्रमात उपसरपंच सुनील शिंदे, महादेव धनवडे ,बापुसोा दळवी, गुंडू दळवी, सुकुमार सकाप्पा, राम शिंदे, रामचंद्र वाळकुंजे, ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक, शंकर लंबे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व देवराई टीम उपस्थित होते.

Web Title: Planting of 1100 saplings on the occasion of Environment Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.