निसर्गदूत फौंडेशनतर्फे मोठ्या वृक्षांचे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:28 AM2021-06-09T04:28:50+5:302021-06-09T04:28:50+5:30
कोल्हापूर : पर्यावरण रक्षणासाठी निसर्गदूत फौंडेशनची स्थापना करण्यात आली असून, या फौंडेशनच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंग, वृक्षारोपण व संवर्धन, ...
कोल्हापूर : पर्यावरण रक्षणासाठी निसर्गदूत फौंडेशनची स्थापना करण्यात आली असून, या फौंडेशनच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंग, वृक्षारोपण व संवर्धन, प्लास्टिक मुक्ती, ध्वनी-वायू प्रदूषण रोखण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात.
५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून निसर्गदूत फौंडेशनच्यावतीने जरग नगर कमानीसमोर भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मोठ्या जंगली वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. जरगनगर परिसरातील अमीर मुल्ला, दत्तात्रय कुलकर्णी, वसंतराव ठोंबरे, बाबूराव साळोखे, अनिल प्रभावळीकर, अशोक पाटील, श्री. हलके, आळवणे, रामचंद्र कांबळे, नामदेव पाडळकर, महादेव साळोखे, अशोक ऱ्हाटवळ, भानुदास पिसे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आज लावलेल्या वृक्षांमध्ये जांभूळ, आंबा, गुलमोहर, कदंब, वड, पिंपळ, सीता-अशोक, पॅथोडीया आदी वृक्षांचा समावेश होता.
निसर्गदूत फौंडेशनचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी उपस्थित सर्वांना जमीन, पाणी, हवा, वनस्पती आणि ऊर्जा यांचा अतिरिक्त व अवास्तव वापर न करण्याची शपथ दिली. निसर्गदूतच्या सदस्यांनी आज श्रमदान करून ही वृक्षारोपण मोहीम यशस्वी केली. यामध्ये योगेश चिकोडे, जयदीप मोरे, सचिन साळोखे, कृष्णात आतवाडकर, श्रीधर साळोखे, सुमित पाटील, सागर पाटील, शंतनू मोहिते, अक्षय निरोखेकर, सिद्धार्थ तोरस्कर, विजय पाटील आदींसह भागातील नागरिक उपस्थित होते.