कोल्हापुरात अंबा, पेरू, अशोक वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:16 AM2021-07-05T04:16:20+5:302021-07-05T04:16:20+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनातर्फे आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेवेळी वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत शाहू जलतरण तलाव, टाकाळा येथील छत्रपती राजाराम ...
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनातर्फे आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेवेळी वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत शाहू जलतरण तलाव, टाकाळा येथील छत्रपती राजाराम उद्यानामध्ये आंबा, पेरू, अशोक अशा वृक्षांची लागवड करण्यात आली. याशिवाय जुन्या झाडांभोवती असलेले तण काढणे, प्लास्टिक कचरा संकलन स्वच्छता मोहीम घेण्यात आली.
या मोहिमेत वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुढे, सतीश कोरडे, विशाल पाटील, गणेश मिसाळ, सचिन पोवार, शैलेश टिकार, अथर्व गोडसे, मोहन शेटे, मयूर वनकुद्रे, आदी सदस्यांनी सहभाग घेतला.
शहरात झालेल्या महास्वच्छता अभियानात अर्धा टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. ही मोहीम महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनखाली पार पडली. सदरची स्वच्छता मोहीम पंचगंगा नदीघाट परिसर, कसबा बावडा घनकचरा प्रकल्पाच्या परिसरात राबविण्यात आली. मोहीम महापालिकेच्या ४० स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने राबविण्यात आली. यावेळी विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे, महेश भोसले, शुभांगी पोवार, मनोज लोट व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो क्रमांक - ०४०७२०२१-कोल-ट्री प्लॅन्ट
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत आयोजित केलेल्या महास्वच्छता मोहिमेवेळी वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत आंबा, पेरू, अशोका या वृक्षांची लागवड करण्यात आली.